पुणे जिल्हा | शरद बँकेच्या सभेत गुणवंत भूमिपुत्रांचा गौरव

मंचर (प्रतिनिधी) – मंचर (ता.आंबेगाव) येथील शरद सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुणे जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी चमकदार कामगिरी करून वरिष्ठ पातळीवर नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आणि शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कुलगुरू नांदेड युनिव्हर्सिटी मनोहर चासकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, आनंद भंडारी,शुभम थिटे, लेखा परीक्षक प्रतीक क्षीरसागर, कुणाल हुले, वैष्णवी मखर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार अलका उंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत दांगट, भाग्यश्री जाधव, श्वेता करंडे, सारिका इचके,
नितीन निडगुले, तुषार लोखंडे, पीडीसीसी बँकचे सहायक व्यवस्थापक अंकुश हिंगे, डॉ. समृद्धी शिंदे, आयकर अधिकारी रोहन भेके, वरिष्ठ सहाय्यक अजय गुंजाळ, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संदेश तांबे, जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता गणेश धानापुने, पुणे जिल्हा परिषदेच्या लिपिक शोभा धनापुने, जलसंपदा विभागाच्या कालवा निरीक्षिका गौरी ढोकले,
स्वप्नाली केंगले, प्रियंका तांबे, मुंबई लोहमार्ग पोलीस प्राजक्ता भोर, सोमनाथ रोडे, अक्षदा तोत्रे, पोलीस सायली थोरात, अश्विनी गायकवाड, अमोल सातपुते, ठाणे येथील पोलीस प्राजक्ता जाधव, पूजा टाव्हरे, रत्नागिरी येथील वनरक्षक किरण पाचारणे, परभणी येथील सिव्हिल इंजिनियर तुषार वाळुंज,
रयत शिक्षण संस्था परिषद विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब्रँड अँबेसिडर राजश्री भागवत, दिपाली खैरे,ग्रंथालय अक्षय सुतार, एस आर पी एफ अभिषेक तांबे, तलाठी काजल जाधव यांना सन्मानित करण्यात आले.





