शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याने दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरेंना दिली ऑफर; म्हणाले…

मुंबई : आज संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात दसरा साजरा केला जात आहे. आज राज्यात ६ दसरा मेळावे होत आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पॉडकास्टमधून येणारी निवडणूक ही वचपा काढण्याची असल्याचं सांगत मोठा इशारा लोकांना दिला आहे. त्यांच्या या वक्तवव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंना ऑफर दिली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले, राज ठाकरेंचा विषय त्यांच्या पद्धतीचा असतो, चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट बोलण्याचा प्रयत्न ते करत असतात. राज ठाकरेंना महाराष्ट्राची चिंता आहे महाराष्ट्रासाठी ते काम करत असतात. आम्हाला खात्री आहे ते आमच्या विचारांशी जोडलेले आहेत. राज ठाकरेंचे मत परखड असतं डावपेच नसतात.
आम्ही त्यांच्या सूचना गांभीर्याने घेऊ.. कामांचं मूल्यमापन केलं तर मागच्या सरकारच्या तुलनेत या सरकारने प्रचंड कामं केली अनेक योजना आखल्या जनता हुशार आहे ती आम्हालाच मत देईल. राज ठाकरेही आमच्यासोबत येतील. राज ठाकरेंची महाराष्ट्राला गरज आहे. आमच्या सोबत आल्यास आम्ही नक्कीच त्याचं स्वागत करू असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.





