विधीमंडळात आदित्य ठाकरे म्हणाले,”खातं कळालं कि नाही,”, “तुमच्याच बापाने खातं दिलं” म्हणत गुलाबरावांचा पलटवार

Gulabrao Patil-Aaditya Thackeray । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात चांगलाच शाब्दिक मारा झाल्याचे पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होताना दिसून आली. आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. त्या टीकेला त्यांच्याच भाषेत गुलाबराव पाटलांनी उत्तर दिले.
“मंत्र्यांना त्यांचं खातं कळालंय की नाही” Gulabrao Patil-Aaditya Thackeray ।
सभागृहात आज आदित्य ठाकरे यांनी ‘मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करु यावा. एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तर ते राखीव ठेवावे. मंत्र्याला सांगा अभ्यास करुन उत्तर द्या. पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालंय की नाही,’ अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या या टीकेचा रोख मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता.
आदित्य ठाकरे यांनी हे वाक्य बोलले आणि खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील लगेच उठून उभे राहिले. आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांना चांगलीच लागली. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला. अहो यांच्या बापाला कळालं होतं, म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ‘बाप’ ऐवजी ‘वडील’ शब्द वापरुन सारवासारव केल्याचे दिसून आले.
दरम्यान, गुलाबराव पाटील हे शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्याने आदित्य ठाकरे यांचा आदेश गुलाबराव पाटील यांच्यासाठी शिरसावंद्य असायचा. मात्र, आज शिंदे गटात गेल्यानंतर त्याच गुलाबराव पाटील यांनी सगळ्यांदेखत आदित्य ठाकरे यांचा बाप काढला.
सभागृहात नेमकं काय झालं ? Gulabrao Patil-Aaditya Thackeray ।
गुलाबराव पाटील हे सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्यासंबंधीच्या प्रश्नांवर उत्तरे दिली. कृषी खात कधी युरीया वापरा तर कधी नॅनो युरिया वापरायला सांगत आहे. आपल्याला बैठक घेऊन यावर निर्णय घ्यावा लागेल. शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर करावा यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. आपण पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये आर ओ प्लांट लावले आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. गुलाबराव पाटील उत्तर देत असताना आदित्य ठाकरे बोलायला लागले. त्यावर गुलाबराव पाटील यांनी तुम्ही शांत बसा असे म्हटल्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी आक्षेप घेतला. यानंतर अध्यक्षांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांत राहण्याचे आदेश दिले. त्यांनतर आदित्य ठाकरे यांनी खात्यावरून गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या बापावरून एकमेकांवर शाब्दिक हल्लाबोल केला.





