Gulab Jamun history: “गुलाब जामुनचा गोड इतिहास: परदेशातून भारतात आलेली चवदार कहाणी”
Gulab Jamun history इतिहासकारांच्या मते, गुलाब जामुनचा उगम मध्यपूर्वेत झाला. फारसमध्ये “लुकमत-अल-कादी” नावाची एक गोड डिश बनवली जायची. ही डिश मैद्याच्या गोळ्यांना तळून त्यांना मधाच्या किंवा साखरेच्या पाकात भिजवून तयार केली जायची. याच डिशने पुढे भारतात येऊन “गुलाब जामुन”चे रूप घेतले.

Gulab Jamun history: भारतातील प्रत्येक सण, लग्न किंवा आनंदाचा क्षण म्हटला की एक मिठाई हमखास आठवते ती म्हणजे गुलाब जामुन. पण ही आपल्या मनात बसलेली आवडती मिठाई खरंतर भारतात जन्मलेली नाही, हे अनेकांना माहीत नाही. तिचा उगम थेट फारस (आजचा इराण) या देशाशी जोडलेला आहे.
इतिहासकारांच्या मते, गुलाब जामुनचा उगम मध्यपूर्वेत झाला. फारसमध्ये “लुकमत-अल-कादी” नावाची एक गोड डिश बनवली जायची. ही डिश मैद्याच्या गोळ्यांना तळून त्यांना मधाच्या किंवा साखरेच्या पाकात भिजवून तयार केली जायची. याच डिशने पुढे भारतात येऊन “गुलाब जामुन”चे रूप घेतले.
भारतात ही मिठाई कशी आली याबद्दल एक लोकप्रिय कथा आहे. असे म्हणतात की मुघल बादशाह शाहजहान यांच्या दरबारात एका स्वयंपाक्याने चुकून ही मिठाई तयार केली. फारसी रेसिपी बनवताना त्याने भारतीय घटकांचा वापर केला आणि त्यामुळे एक नवीन, वेगळा स्वाद तयार झाला. जेव्हा शाहजहान यांनी ही मिठाई चाखली, तेव्हा त्यांना ती खूप आवडली. हळूहळू ही मिठाई राजवाड्यांमधून सामान्य लोकांच्या ताटात पोहोचली.

Gulab Jamun
“गुलाब जामुन” या नावामागेही एक रोचक अर्थ आहे. “गुलाब” हा शब्द फारसी भाषेतून आला आहे “गुल” म्हणजे फूल आणि “आब” म्हणजे पाणी. सुरुवातीला या मिठाईच्या पाकात गुलाबजल वापरले जायचे, त्यामुळे त्याला “गुल-आब” असे नाव मिळाले. तर “जामुन” हा शब्द त्याच्या आकार आणि रंगावरून आला. ही मिठाई काळसर-तपकिरी रंगाची आणि गोल असल्यामुळे तिची तुलना जांभळ्या जामुन फळाशी केली गेली.
फारसी “लुकमत-अल-कादी” आणि भारतीय गुलाब जामुन यामध्ये थोडा फरक आहे. फारस मध्ये ही मिठाई मैद्यापासून बनवली जात होती, तर भारतात आल्यावर त्यात “खोवा” (दूधापासून तयार पदार्थ) वापरला जाऊ लागला. त्यामुळे गुलाब जामुन अधिक मऊ, रसाळ आणि चविष्ट बनला.
आज भारतात गुलाब जामुनचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. बंगालमध्ये “पंतुआ”, मध्य प्रदेशात “काळा जामुन”, तर राजस्थानमध्ये “पनीर गुलाब जामुन” अशा विविध प्रकारांनी ही मिठाई अधिक समृद्ध झाली आहे. प्रत्येक राज्याने आपल्या पद्धतीने त्यात बदल करून त्याला खास चव दिली आहे.
आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात नवीन मिठाया बाजारात येत असल्या तरी गुलाब जामुनची लोकप्रियता अजूनही तशीच कायम आहे. प्रत्येक गोड क्षणात त्याचे विशेष स्थान आहे.
म्हणून पुढच्या वेळी तुम्ही गरमागरम गुलाब जामुन खाल, तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक मिठाई खात नाही आहात, तर सुमारे ५०० वर्षांचा जागतिक इतिहास अनुभवत आहात.



