Pune: भैरवीच्या ‘इंटरनॅशनल फूड फेस्टिवल’ला प्रतिसाद

पुणे – चोखंदळ खवाय्यांच्या जिभेवर चव रेंगाळत ठेवणाऱ्या ‘भैरवी प्युअर व्हेज’ यांच्यावतीने ‘इंटरनॅशनल फूड फेस्टिवल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याला खवय्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘मल्हार माची’, ‘जलसृष्टी’ अशा दर्जेदार रिसॉर्टची साखळी असलेल्या आणि मागील 22 वर्षांपासून हॉटेल व्यवसायामार्फत ग्राहकांच्या जिभेची चव टिकवून ठेवण्यास या समूहाला यश आले आहे.
‘भैरवी’तर्फे दरवर्षी श्रावणात ‘बिर्याणी आणि कबाब’ महोत्सव आयोजित केला जातो. त्याच धर्तीवर गेली नऊ वर्षे हा ‘इंटरनॅशनल फूड फेस्टिवल’ भरवला जातो. डिसेंबरच्या गुलाबी थंडीत हा फेस्टिव्हल म्हणजे खव्वयांसाठी पर्वणीच! यंदा या फेस्टिवलचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती सोनाई डेअरीचे मॅनजिंग डायरेक्टर दशरथ माने यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी माने यांनी ‘भैरवी’च्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत ‘सोनाई डेअरी’चा प्रवास उलगडला. भारतातील दुग्ध व्यवसाय आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या विविध संबंधित प्रश्ननांची उत्तरे त्यांनी दिली. दरम्यान, या इंटरनॅशनल फूड फेस्टिवलमध्ये ग्राहकांना विविध देशांतील खाद्य संस्कृतीमधून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या डिशेस चाखायला मिळणार आहेत. यामध्ये खवय्यांनी “इंटरनॅशनल फूड फेस्टिवल’ला 30 डिसेंबरपूर्वी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पदार्थांच्या असंख्य व्हरायटीज
स्टार्टर्स पदार्थांत वाइल्ड मशरूम कॅपेचिनो सूप, डिमसम, सुशी, क्रंची बेसील, कॉटेज चीज, मेझे प्लॅटर, मशरूम अरेन चिनी बॉल्स, बँकॉक स्टाइल जिंजर मशरूम उपलब्ध आहेत. तर, मेन कोर्समध्ये बर्मी खाउसे, ईडमामे, ब्लू पी फ्रायड राइस, गुई नूडल्स, शेफ स्पेसिअल सिझलरस, फातूस सलाड, सनड्राय टोमॅटो, ऑलिव्ह पिझ्झा या आणि अशा अनेक आंतरराष्ट्रीय डिशेशचा आस्वाद घेता येणार आहे.





