Connor Esterhuizen : गुजरातच्या ताफ्यात नव्या ‘फिनिशर’ची एन्ट्री! टॉम बँटनच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक खेळाडू दाखल
Connor Esterhuizen : आयपीएल २०२६ च्या हंगामात गुजरात टायटन्स (GT) संघाने आपल्या ताफ्यात एका स्फोटक खेळाडूची एन्ट्री केली आहे

Connor Esterhuizen Gujarat Titans IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यांसाठी गुजरात टायटन्सने दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज कॉनर एस्टरहुइजन (Connor Esterhuizen) याला आपल्या संघात सामील केले आहे. इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज टॉम बँटन याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो या स्पर्धेला मुकला आहे. त्याच्या जागी एस्टरहुइजनला ७५ लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात घेण्यात आले असून, तो जोस बटलरसाठी मुख्य बॅकअप म्हणून भूमिका बजावेल.
कोण आहे कॉनर एस्टरहुइजन?
२४ वर्षीय कॉनर एस्टरहुइजनने दक्षिण आफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये एमआय केपटाऊन आणि प्रिटोरिया कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करत आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या ५ सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याने आपला जलवा दाखवला. या मालिकेत त्याने १४५.९८ च्या स्ट्राईक रेटने २०० धावा कुटल्या आणि तो सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी राहिला.
Connor Esterhuizen replaces injured Tom Banton in the Gujarat Titans squad for the remainder of IPL 2026.
His record in T20s:
Inns- 39 | Runs- 926 | Avg- 28.93 | SR- 129.87 #ConnorEsterhuizen #TomBanton #GujaratTitans #IPL2026 pic.twitter.com/LNZQdwrySQ— OneCricket (@OneCricketApp) April 17, 2026
‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा मानकरी –
Connor Esterhuizen has been signed by the Gujarat Titans as a replacement for injured Tom Banton in IPL 2026.#GT #IPL2026 #ConnorEsterhuizen #TomBanton pic.twitter.com/25MI8S2R7u
— CricTracker (@Cricketracker) April 17, 2026
आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत एस्टरहुइजनने ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ हा किताब पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेने ती मालिका ३-२ अशी जिंकली होती. ५ सामन्यांत १३ उत्तुंग षटकार मारण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आता गुजरातच्या मधल्या फळीला अधिक मजबूती देणार आहे.
गुजरात टायटन्सने आतापर्यंत ४ पैकी २ सामने जिंकले असून २ सामने गमावले आहेत. आज, शुक्रवारी (१७ एप्रिल) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांचा सामना तळाला असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे.





