Romi Bhinder Fine : मोठा बातमी! राजस्थानच्या मॅनेजरवर बीसीसीआयची कारवाई; शेजारी बसलेल्या वैभवला काय केलं? जाणून घ्या
Romi Bhinder Fine : राजस्थान रॉयल्सचे (RR) मॅनेजर रोमी भिंडर यांनी सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी बीसीसीआयने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

RR Manager Romi Bhinder Fine for using mobile phone : आयपीएल २०२६ (IPL2026) च्या हंगामात मैदानाबाहेरील एका गंभीर प्रकरणाचा निकाल अखेर लागला आहे. राजस्थान रॉयल्सचे (RR) मॅनेजर रोमी भिंडर यांनी सामन्यादरम्यान डगआऊटमध्ये मोबाईल फोनचा वापर केल्याप्रकरणी बीसीसीआयने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच त्यांच्या बाजूला बसलेल्या वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Sooryavanshi) कोणती कारवाई करण्यात आली आहे का? जाणून घेऊया. Romi Bhinder Fine
गुवाहाटी येथे १० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान रोमी भिंडर फोन वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. आयपीएलच्या कडक नियमांनुसार, ड्रेसिंग रूममध्ये फोन नेण्याची परवानगी असली तरी डगआऊटमध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे. या नियमाच्या उल्लंघनामुळे भिंडर यांच्यावर एका लाखाचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून, पुन्हा अशी चूक न करण्याची तंबी देण्यात आली आहे.
“This violation happened in the match between Rajasthan Royals and Royal Challengers Bengaluru, where our anti-corruption unit in Guwahati took note of the violation and issued him an explanation notice on April 12. He was given 48 hours to respond as Romi Bhinder was found or… pic.twitter.com/yNdBEE71wA
— IANS (@ians_india) April 17, 2026
भ्रष्टाचाराचा आरोप नाही, पण नियमांचं उल्लंघन – (Romi Bhinder Fine)
Romi Bhinder Likely to Escape with Warning or Fine
Rajasthan Royals manager Romi Bhinder is unlikely to face serious action from the BCCI’s ACSU for using a mobile phone in the dugout against RCB, as per Cricbuzz.
While his conduct was termed indiscreet, there’s no evidence of… pic.twitter.com/i4xp78UGdY
— Cricketopia (@CricketopiaCom) April 17, 2026
रोमी भिंडर यांच्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, अँटी करप्शन युनिटने (ACU) केलेल्या चौकशीत त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून ‘क्लीन चिट’ दिली आहे. तपासात असे समोर आले की, त्यांनी कोणाशीही संशयास्पद संभाषण केले नव्हते. तसेच, त्यांच्या शेजारी बसलेला १५ वर्षीय युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी यालाही या प्रकरणात दोषमुक्त करण्यात आले असून त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.
आरोग्याच्या कारणास्तव वापरला फोन? (Romi Bhinder Fine)
तपासादरम्यान रोमी भिंडर यांनी स्पष्ट केले की, त्यांनी बीसीसीआयकडे फोन वापरण्यासाठी सवलत मागितली होती. आयपीएल सुरू होण्यापूर्वी ते गंभीर आजारी होते आणि फुफ्फुसांच्या विकारामुळे काही काळ आयसीयूमध्ये होते. उपचारांच्या संदर्भात डॉक्टरांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी फोन सोबत ठेवला होता. मात्र, बीसीसीआयने त्यांचे हे समर्थन मान्य केले असले तरी, डगआऊटमधील फोनचा वापर हा शिस्तीचा भंग मानत त्यांना दंड ठोठावला आहे. आयपीएलच्या पारदर्शकतेसाठी बोर्डाने हा कठोर निर्णय घेतला आहे.





