CSK संघातून तडकाफडकी बाहेर पडलेला खेळाडू यावेळी बनला 4.40 कोटींचा मालक

Joshua Little – आयपीएल २०२३ हंगामासाठी शुक्रवारी कोच्ची येथे मिनी लिलावाची प्रक्रिया पार पडली. या लिलावात विदेशी अष्टपैलू खेळाडूंचा दबदबा राहिला. इंग्लंडचा सॅम कुरन, ऑस्ट्रेलियाचा कॅमरॉन ग्रीन, इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स आणि इंग्लंडचाच हॅरी ब्रूक्स यांच्यावर फ्रेंचायझींकडून पैशांचं पाऊसच पडला. आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वाधिक १८ कोटी ५० लाख एवढी किंमत मोजत पंजाब किंग्जने कुरनला आपल्या संघात घेतले. त्याचबरोबर ग्रीनसाठी मुंबई इंडियन्सने १७ कोटी ५० लाख रुपये खर्च केले. दरम्यान, आर्यलंडच्या जोशुआ लिटिल यानेही लिलावावेळी चांगलाच भाव खाल्ला. गुजरात संघाने त्याला आपल्याकडे घेण्यासाठी ४ कोटी ४० लाख एवढी किंमत मोजली.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप
नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात आर्यलंडच्या या युवा खेळाडूने दमदार कामगिरी केली. लिटिलने ७ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हॅट्रिक घेण्याची कामगिरी केली आहे. त्याची या लिलावासाठी मूळ किंमत ही ५० लाख अशी होती. मात्र, या खेळाडूची संघासाठी उपयुक्तता पाहता गुजरात आणि लखनऊ यांच्यामध्ये त्याला घेण्यासाठी शर्यत लागली होती. शेवटी मोठी रक्कम खर्च करत गुजरातने त्याला संघात घेण्यात यश मिळवले.
विकत घ्यायला ती वस्तू आहे का? रहाणेचा फोटो शेअर करत शरद पोक्षेंनी व्यक्त केला संताप
महत्वाचं म्हणजे, मागील हंगामात जोशुआ लिटिल चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग राहिला होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्यास संधी मिळाली नव्हती. त्यावेळी त्याला विदेशी गोलंदाजाला दुखापत झाल्यावर तुला संघात स्थान दिले जाईल, असे सांगण्यात आले होते. तो चेन्नईसाठी नेट गोलंदाज म्हणूनही आपले योगदान द्यायचा. मात्र, तिथेही त्याला पुरेशी संधी मिळत नव्हती. त्यामुळे त्याने तेव्हा सीएसके सोडण्याचा निर्णय घेतला होता.
😉 Joshua Little, Bada Dhamaka 💥
The 🇮🇪 bowler is all set to don the @gujarat_titans jersey in the upcoming #TATAIPL 👕#TATAIPLAuction #IPL2023Auction #IPLAuction #TATAIPLAuctionOnJioCinema #AuctionFreeOnJioCinema pic.twitter.com/CzhclUFQV4
— JioCinema (@JioCinema) December 23, 2022





