Gujarat Election – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या त्याची पत्नी रिवाबा जडेजाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त दिसत आहे. मागील बऱ्याच काळापासून जडेजा क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला आहे. टी-२० विश्वचषकात भारतासाठी रवींद्र जडेजा अत्यंत महत्वाचा खेळाडू मानला जात असताना त्याला गुडघ्याची दुखापत झाली आणि तो या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हापासून तो संघाबाहेर राहिला असून सध्या तो गुजरातच्या राजकीय मैदानात उतरलेला दिसत आहे.
“पुढील वर्षी वर्ल्डकप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही”, पीसीबीची मोठी घोषणा
टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर टी-२० आणि वनडे मालिका खेळण्यासाठी गेला. मात्र या दौऱ्यावर संघातील बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आणि आणि युवा खेळाडूंना या दौऱ्यावर पाठवले. न्यूझीलंडविरद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने १-० ने बाजी मारली. त्यानंतर आता वनडे मालिका खेळली जात आहे. दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी संघातील सर्वच वरिष्ठ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. मात्र, या संघामध्ये रवींद्र जडेजाचे नाव नसल्याने आश्चर्य वाटत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतुन जडेजा स्वतः माघार घेतली असल्याचे बीसीसीआयने संगीतीतले आहे. त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार तो कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे रवींद्र जडेजा पत्नी रिवाबा जडेजाच्या प्रचारात व्यस्त दिसत आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी ( Gujarat Election ) जामनगर उत्तर या मतदार संघातून रिवाबा जडेजा यांना भाजप पक्षकाडून उमेदवारी देणार आली आहे. त्यामुळे रवींद्र जडेजा प्रचारात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.
खंभालिया में क्रिकेटर रविंद्र जडेजा का रोड शो,
भाजपा के उमेदवार मुलुभाई बेरा के चुनाव प्रचार के लिए पोहचे रविंद्र जडेजा,
रवींद्र जडेजा का रोड शो शहेर के विविध मार्गो पर निकाला गया.@imjadeja #rajputboy #RAVINDRAJADEJA #khambhalia #Roadshow #Election2022 pic.twitter.com/ZD4yXHvAj7— MOHMMAD CHAKI (@MohmadChaki) November 25, 2022
Gujarat | Cricketer Ravindra Jadeja today campaigned for his wife & BJP candidate from Jamnagar North, Rivaba Jadeja, in Khambhalia, Jamnagar pic.twitter.com/z8iyQSnhEB
— ANI (@ANI) November 25, 2022
ભારત દેશ નુ અને જામનગર શહેર નુ ગૌરવ જેમને આંતરરાષ્ટ્રીય ક્રિકેટ ક્ષેત્રે અનેક સિદ્ધિઓ પ્રાપ્ત કરી દેશ નું અને જામનગર નું ગૌરવ વધારેલ તેવા ઓલ રાઉન્ડર ક્રિકેટર શ્રી @imjadeja નો ભવ્ય રોડ શો. 1/1 pic.twitter.com/XVFEXYkBHq
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) November 24, 2022