GT vs SRH : साई सुदर्शनने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

Sai Sudharsan breaks Sachin Tendulakar T20 Record in GT vs SRH match : शुक्रवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या. जेव्हा या डावखुऱ्या फलंदाजाने त्याच्या डावात ३२ धावा केल्या, तेव्हा त्याने हा खास पल्ला गाठला. सुदर्शनने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. त्याच्यापुढे फक्त ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आहे, ज्याने ५४ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे.
साई सुदर्शनने मोडला सचिनचा विक्रम –
२३ वर्षीय तमिळनाडूचा फलंदाज साई सुदर्शनने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने २००६ मध्ये भारताच्या पहिल्या टी-२० सामन्यात पदार्पण केले होते आणि २०११ मध्ये ५९ व्या डावात २००० धावा पूर्ण केल्या होत्या. त्याचबरोबर त्याच्या पुढे फक्त एकच खेळाडू आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आहे, ज्याने ५४ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे.
4⃣0⃣4⃣4⃣4⃣4⃣
No, that’s not a pincode ❌
That’s what Sai Sudharshan scored off Mohd. Shami in the third over 🔥#GT race to at 82/0, their best Powerplay score ever!
Updates ▶ https://t.co/u5fH4jQrSI#TATAIPL | #GTvSRH pic.twitter.com/GQKXI715GQ
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2025
गेल्या हंगामात सुदर्शनने एक खास विक्रमही केला होता. तो आयपीएलमध्ये फक्त २५ डावांमध्ये १००० धावा पूर्ण करणारा सर्वात जलद भारतीय फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकर आणि ऋतुराज गायकवाड यांचा विक्रम मोडला, ज्यांनी ३१ डावांमध्ये हा पराक्रम केला होता. तेंडुलकरने एप्रिल २०१० मध्ये हा विक्रम केला होता, तर गायकवाडने २०२२ च्या हंगामात १००० धावा पूर्ण केल्या होत्या.
हेही वाचा – Babar Azam Instagram : भारताचा पाकिस्तानला दणका: बाबर, रिझवान, आफ्रिदींचे इन्स्टा अकाउंट ब्लॉक
सर्वात जलद २००० टी-२० धावा करणारे भारतीय फलंदाज (डाव) :
- ५४ – साई सुदर्शन
- ५९ – सचिन तेंडुलकर
- ६० – ऋतुराज गायकवाड
- ६१ – देवदत्त पडिकल
- ६१ – रजत पाटीदार
- ६६ – सुरेश रैना
- ६६ – ऋषभ पंत
- ६६ – प्रशांत चोप्रा
- ६६ – तिलक वर्मा
- ६७ – केएल राहुल





