GT vs RR : साई सुदर्शनचा मोठा धमाका! मोडला ख्रिस गेलचा खास विक्रम

GT vs RR Sai Sudarshan breaks Chris Gayle’s record : आयपीएल २०२५ मध्ये साई सुदर्शनची अद्भुत कामगिरी सुरूच आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सुदर्शनची बॅटही जोरदार तळपली. त्याने अवघ्या ५३ चेंडूत ८२ धावांची वादळी खेळी साकारली. आयपीएलच्या १८ व्या हंगामात सुदर्शनची ही तिसरी अर्धशतकी खेळी ठरली. सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरताना, सुदर्शनने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई करताना ख्रिस गेलचा एक मोठा विक्रमही मोडला.
सुदर्शनची आणखी एक अद्भुत खेळी –
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार गिल अवघ्या २ धावा काढून बाद झाला. दुसऱ्या टोकाला, साई सुदर्शनने जोस बटलरसोबत दुसऱ्या विकेट्ससाठी ८० धावांची भागीदारी केली. यादरम्यान, सुदर्शनने फक्त ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर सुदर्शनने आक्रमक वृत्ती दाखवत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. सुदर्शनने ५३ चेंडूत ८ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारत ८२ धावांची खेळी साकारली.
साई सुदर्शनने मोडला ख्रिस गेलचा मोठा विक्रम –
Most runs by an Indian after 3️⃣0️⃣ innings ✅
Second-most overall ✅
Average of 48+ ✅You say Consistency, we hear Sai Sudharsan 💙
Scorecard ▶ https://t.co/raxxjzY9g7#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/jJ8XJO3wI6
— IndianPremierLeague (@IPL) April 9, 2025
या खेळीदरम्यान साई सुदर्शनने ख्रिस गेलचा मोठा विक्रमही मोडला. आयपीएलमध्ये ३० डाव खेळल्यानंतर, सुदर्शन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ३० डावांनंतर, सुदर्शनच्या नावावर १३०७ धावा आहेत. तर, ख्रिस गेलने ११४१ धावा केल्या होत्या. या यादीत, फक्त शॉन मार्श सुदर्शनच्या पुढे आहे, ज्याने ३० डाव खेळून १३३८ धावा केल्या आहेत.
हेही वाचा – GT vs RR : साई सुदर्शनच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातने राजस्थानसमोर उभारला धावांचा डोंगर
सुदर्शनने अहमदाबादमध्ये झळकावले सलग पाचवे अर्धशतक –
साई सुदर्शन आयपीएलमध्ये एकाच मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. अहमदाबादमधील याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर, साई सुदर्शनने २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त धावांच्या सलग दोन डाव खेळले होते. त्यानंतर, या वर्षीही त्याने त्याच मैदानावर सलग तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावांचे डाव खेळल्याृ आहेत. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने हे केले नाही. २०१८ ते २०१९ या काळात आरसीबीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्सनेही असाच पराक्रम केला होता. आता कोणीतरी त्याची बरोबरी केली आहे.
हेही वाचा – KKR vs LSG : ‘…तर मोठा वाद होईल’, केकेआरच्या पराभवानंतर पिच क्युरेटरवर संतापला अजिंक्य रहाणे
सामन्याबद्दल बोलायचे तर, साई सुदर्शनच्या ८२ धावांच्या स्फोटक खेळीमुळे गुजरात टायटन्सने राजस्थानसमोर २१८ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर शुबमन गिलच्या संघाने २० षटकांत सहा गडी गमावून २१७ धावा केल्या. राजस्थानकडून तुषार देशपांडे आणि महेश टिक्षणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





