GT vs MI : रोहितचा रणसंग्राम: IPL प्लेऑफमध्ये मोडला स्वतःचाच ४ वर्षांपूर्वीचा खास विक्रम

GT vs MI Rohit Sharma break Himself record in Playoffs : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जात आहे. आज जो कोणी हा सामना हरेल, तो बाहेर पडेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघ पूर्ण तयारीने मैदानात उतरले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातसमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यादरम्यान रोहित शर्माने आपलाच ४ वर्षांपूर्वीचा एक खास विक्रम मोडला.
रोहित शर्माने आयपीएल प्लेऑफच्या इतिहासात एक नवा विक्रम केला. २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या प्लेऑफ सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. त्याच वेळी, आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ८१ धावा केल्या. यासह रोहितने आयपीएल २०२० मध्ये स्वतः रचलेला विक्रम मोडला.
रोहितने आयपीएल प्लेऑफमध्ये मोडला स्वतःचाच विक्रम –
KING ROHIT HITS 7000! 👑🔥
Mullanpur witnesses history as The Hitman smashes past 7000 IPL runs like a true legend!
SKY shines bright ☄️, MI cruising at 143/2 in 13 overs.
And yes — Avneet Kaur’s cheers = unmatched vibe! 💙💥#RohitSharma𓃵 #MIvsGT #HitmanEra #7000RunsClub… pic.twitter.com/xWBR1z6KNq— Sindhu Sherni🦁 (@SindhuK66662473) May 30, 2025
रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध ५० चेंडूंचा सामना करत ८१ धावा केल्या. हा त्याचा आयपीएल प्लेऑफमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी आयपीएल २०२० मध्ये, त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्लेऑफ सामन्यात ६८ धावांची खेळी केली होती. यानुसार, रोहितने आयपीएल प्लेऑफमध्ये स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
हेही वाचा – GT vs MI : हिटमॅनचा गुजरातविरुद्ध हल्लाबोल! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
बेअरस्टो-रोहितने मुंबईला करुन दिली धडाकेबाज सुरुवात –
गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात, मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर साई किशोरने ४७ धावांवर बेअरस्टोची विकेट घेतली. त्याने २३१ च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.
हेही वाचा – Avinash Sable : अविनाश साबळेची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३६ वर्षांनंतर स्टीपलचेसमध्ये रचला इतिहास
रोहित शर्माने पूर्ण केले ३०० षटकार –
या सामन्यात रोहित शर्माला सुरुवातीलाच दोन जीवदान मिळाले. त्याला सुरुवातीला तीन धावांवर आणि नंतर १२ धावांवर जीवदान मिळाले. त्यानंतर रोहित शर्माने कोणतीही संधी दिली नाही आणि सतत धावा काढत राहिला. रोहित शर्माने सामन्यात दोन षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा भारताचा पहिला फलंदाज आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. त्याने फक्त १४२ आयपीएल सामन्यांमध्ये ३५७ षटकार मारले आहेत.





