GT vs MI : मुंबईची पलटण गुजरातच्या टायटन्सवर पडली भारी! क्वालिफायर २ मध्ये मारली एन्ट्री, सुदर्शनची खेळी ठरली व्यर्थ

GT vs MI Mumbai Indians enter Qualifier 2 : पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सने सहाव्या जेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. या विजयात मुंबईची गोलंदाजी आणि रोहित-जॉनी भागीदारी महत्त्वाची ठरली. आता मुंबईचा पुढील सामना रविरारी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबशी होणार आहे.
मुल्लानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात, मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली आणि रोहित शर्माच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर प्लेऑफ इतिहासातील सर्वाधिक २२८ धावा केल्या. यानंतर, साई सुदर्शनने जबरदस्त खेळी करत गुजरातला सामन्यात टिकवून ठेवले होते. परंतु जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी जोरदार पुनरागमन केले आणि संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
गुजरातला खराब क्षेत्ररक्षण पडलं महागात –
𝙈𝙄-𝙜𝙝𝙩𝙮 effort on a 𝙈𝙄-𝙜𝙝𝙩𝙮 occasion 💙@mipaltan seal the #Eliminator with a collective team performance ✌
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQNeP#TATAIPL | #GTvMI | #TheLastMile pic.twitter.com/cJzBLVs8uM
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
शुक्रवारी, ३० मे रोजी खेळल्या गेलेल्या प्लेऑफच्या दुसऱ्या सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित होती आणि तेच घडले. या सामन्यात मुंबईने जितकी जोरदार फलंदाजी केली तितकीच गुजरातची क्षेत्ररक्षणही तितकीच खराब होती, ज्याने ४ सोपे झेल सोडले. यामध्येही दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात ५ चेंडूंच्या आत रोहित शर्माचे २ झेल सोडण्यात आले, तर काही वेळाने जॉनी बेअरस्टोलाही जीवदान देण्यात आले. या दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच मुंबईच्या विजयाचा पाया रचला.
हेही वाचा – GT vs MI : रोहितचा रणसंग्राम: IPL प्लेऑफमध्ये मोडला स्वतःचाच ४ वर्षांपूर्वीचा खास विक्रम
रोहित-बेअरस्टोची भागीदारी ठरली निर्णायक –
𝘾𝙤𝙢𝙚𝙩𝙝 𝙩𝙝𝙚 𝙝𝙤𝙪𝙧, 𝙘𝙤𝙢𝙚𝙩𝙝 𝙩𝙝𝙚 𝙃𝙞𝙩𝙢𝙖𝙣 ✨
Rohit Sharma’s composed 81(50) wins him the Player of the Match award 👏
Scorecard ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/PILBfEJNlA
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
रोहित शर्मा आणि बेअरस्टो यांनी ८४ धावांची भागीदारी केली, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर तिलक वर्मा यांनीही रोहितसोबत उत्तम आणि जलद भागीदारी केली. बेअरस्टो आणि सूर्या यांना अर्धशतक करता आले नाही पण चढ-उतारांनी भरलेला हंगाम पाहिल्यानंतर रोहितने ८१ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्यानंतर, शेवटच्या षटकात कर्णधार हार्दिक पंड्याने ३ षटकार मारून संघाला २२८ धावांपर्यंत पोहोचवले. शेवटच्या षटकात २२ धावा आल्या आणि हा मोठा फरक ठरला. गुजरातकडून साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णाने २-२ विकेट्स घेतले.
हेही वाचा – GT vs MI : हिटमॅनचा गुजरातविरुद्ध हल्लाबोल! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
साई सुदर्शनची ८० धावांची खेळी ठरली व्यर्थ –
A crucial partnership building for #GT 👌
The lefties guiding them on the right note 🤜🤛
They need 92 runs in 44 balls
Updates ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile pic.twitter.com/p1coaokuHE
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
गुजरात टायटन्सची सुरुवात खूप खराब झाली, जेव्हा शुभमन गिल पहिल्याच षटकात बाद होऊन परतला. त्यानंतर कुसल मेंडिसही फार वेळ टिकला नाही आणि २० धावा करून बाद झाला. मिचेल सेंटनरच्या चेंडूवर शॉट खेळताना तो हिट विकेट झाला. दोन विकेट पडल्यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंगटन सुंदर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने यॉर्कर चेंडूवर सुंदरला बाद केलं आणि ही भागीदारी तुटली. पण साई सुदर्शन एका बाजूने खंबीरपणे उभा राहिला आणि ४९ चेंडूत ८० धावांची खेळी केली, ज्यात १० चौकार आणि एक षटकार होता. तो बाद होताच गुजरातचा डाव कोसळला. शेरफेन रदरफोर्डने १५ चेंडूत २४धावा केल्या.





