GT vs CSK : चेन्नईने आपल्या हंगामाचा शेवट केला गोड; गुजरातच्या टॉप-२ मध्ये पोहोचण्याच्या आशांना बसला धक्का

GT vs CSK CSK thrash GT by 83 runs in IPL 2025 : कॉनवे-ब्रेव्हिसच्या तुफानी अर्धशतकानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सला ८३ धावांनी पराभूत केले. यासह पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या सीएसके संघाने आयपीएल २०२५ मधील आपल्या मोहिमेचा शेवट गोड केला. दुसरीकडे, गुजरात टायटन्सला २० गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थान निश्चित करण्यात अपयश आले. या सामन्यात चेन्नईने २३१ धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १८.३ षटकांत १४७ धावांवर गारद झाला.
आयपीएल २०२५ मध्ये आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालणारे कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांना सीएसकेविरुद्ध काही खास कामगिरी करता आली नाही. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातकडून शुबमन गिल ९ चेंडूत १३ धावा काढून बाद झाला, तर सुदर्शनने २८ चेंडूत ४१ धावा करून काही काळासाठी आशा निर्माण केल्या, परंतु रवींद्र जडेजाने त्याला बाद करून गुजरातला सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले. त्याच्या या खेळीत त्याने एकही षटकार न मारता ६ चौकार मारले.
The 5⃣-time champs sign off from #TATAIPL 2025 with a convincing win 💛#CSK register a HUGE 83-run win over #GT 👏
Updates ▶ https://t.co/P6Px72jm7j#GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/ey9uNT3IqP
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025





