GT vs CSK : आयुष-उर्विलसह ब्रेव्हिसच्या वादळी खेळीच्या जोरावर सीएसकेने रचला इतिहास

Chennai Super Kings led by young stars in GT vs CSK : आयपीएल २०२५ मधील ६७ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. हा सामना सीएसकेचा यंदाच्या हंगामातील शेवटचा सामना आहे. अशात या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातविरुद्ध एक खास पराक्रम केला आहे. सीएसकेने आयुष म्हात्रे, डेव्हाल्ड ब्रेविस आणि उर्विल पटेल या युवा खेळाडूंच्या फटकेबाजीच्या जोरावर यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.
चेन्नई सुपर किंग्जने नोंदवली यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या –
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात या तीन फलंदाजांच्या या कामगिरीनंतर, सीएसकेचे भविष्य सुरक्षित दिसत आहे. यंदाच्या हंगामात सीएसकेची कामगिरी खराब राहीली असली तरी, शेवटच्या सामन्यात पोहोचेपर्यंत संघासाठी काही चांगले संकेत दिसून आले आहेत. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने गुजरातविरुद्ध २३० धावांचा मोठी धावसंख्या उभारली. ज्यामध्ये आयुष म्हात्रे, उर्विल पटेल आणि डेव्हाल्ड ब्रेव्हिस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Innings Break!#CSK brought the fireworks with a power-packed batting effort to set a 🎯 of 2⃣3⃣1⃣
Will #GT chase it down and seal 🔝 spot?
Updates ▶ https://t.co/P6Px72jm7j#TATAIPL | #GTvCSK | @ChennaiIPL | @gujarat_titans pic.twitter.com/PE8QyHsLww
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
सीएसकेला मिळाले तीन भावी स्टार –
The word ‘fear’ isn’t in their dictionary 🔥#CSK‘s young guns Ayush Mhatre and Urvil Patel added to the Ahmedabad heat with their knocks 👏
Updates ▶ https://t.co/P6Px72jm7j#TATAIPL | #GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/KcM4XW9peg
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2025
१७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रे चेन्नई सुपर किंग्जकडून शानदार फलंदाजी करत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धही आयुषने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात आयुषने २०० च्या स्ट्राईक रेटने ३४ धावा केल्या. यानंतर उर्विल पटेलनेही संघाची धावगती कमी होऊ दिली नाही. त्याने १९ चेंडूंचा सामना करत ३७ धावा केल्या. या दोघांमुळे संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकला. या दोघांच्या डेव्हाल्ड ब्रेव्हिसने तुफानी अर्धशतक झळकावले. डेवाल्ड ब्रेव्हिसने १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने २३ चेंडूत ५७ धावा केल्या.
हेही वाचा – GT vs CSK : आयुष म्हात्रेचा कहर! चौकार-षटकारांचा पाऊस पाडत एकाच षटकात कुठल्या तब्बल ‘इतक्या’ धावा
डेव्हॉन कॉनवेने झळकावले अर्धशतक –
दरम्यान, डेव्हॉन कॉनवेने यंदाच्या हंगामातील आपले दुसरे अर्धशतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली. या चौघांच्या खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्ज गुजरात टायटन्सविरुद्ध २३० धावांचा मोठी धावसंख्या उभारू शकले. यासह, चेन्नईसाठी आयपीएल २०२५ मधील हा सर्वात मोठा स्कोअर ठरला. यापूर्वी, चेन्नईने या हंगामात कोणत्याही संघाविरुद्ध एवढी मोठी धावसंख्या उभारली नव्हती.





