#video : स्मामिनी मंगळागौरच्या खेळांना वाढती मागणी

Updated On:

पुणे –  येथील नारायण पेठेतील स्वामिनी मंगळागौरच्या पारंपरिक मंगळागौर खेळांना वाढता प्रतिसाद मिळत असून, धार्मिक आधिष्ठान जपत गृहिणींच्या अथवा नोकरी करणाऱ्या महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी हे खेळ उपयुक्त ठरत असल्याची माहिती स्वामिनी मंगळागौरच्या मीना जोशी आणि देवयानी इनामदार यांनी दिली आहे.

नववधू लग्न करुन सासरी गेल्यानंतर श्रावण महिन्यातल्या मंगळवारी मंगळागौर पूजनासाठी माहेरी येते. मग घरातील सर्व वयोगटातील महिला या पूजेनंतर विविध पारंपारिक खेळ खेळतात. खरे तर हे खेळ रात्रभर खेळून ती रात्र जागवण्याची पद्धत असते.

मात्र बदलत्या काळानुसार आता दिवसाही हे खेळ खेळून परंपरा जपली जाते हे विशेष. विविध प्रकारच्या फुगड्या, गोफ, झिम्मा, यासह अनेक नवनव्या खेळांचा समावेश असलेल्या या गटाला पुण्यासह विविध भागांतून मागणी असते.

आजवर दै. प्रभातच्या श्रावणगौर महोत्सवासह विविध ठिकाणी स्वामिनी मंगळागौरच्या खेळांना पारितोषिके मिळाली असून, या खेळांमध्ये धनश्री गिजरे, श्रद्धा कुलकर्णी, सुषमा बागडे, राजश्री वेल्हाळ, रुपश्री वनारसे, स्नेहल जोशी, प्राची कुलकर्णी, सुवर्णा नगरकर आणि अनिता शहा यांच्यासह अनेक कलाकार सहभागी होत असतात.

स्मामिनी मंगळागौर ग्रुप, पुणे. मो – 9049855653 / 8625071900
(कृपया व्हिडीओ पाहण्यासाठी क्‍युआर कोड स्कॅन करावा.)

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र