Groundnut Price : शेंगदाण्याच्या दरात मोठी उसळी! १८० रुपये किलोचा टप्पा गाठला; या’ कारणामुळे बाजारात वाढतोय भाव
Groundnut Price : महिनाभरापूर्वी ११० रुपयांना मिळणारा शेंगदाणा आता १८० वर; किरकोळ बाजारात महागाईचा ग्राहकांना मनस्ताप.

Groundnut Price – गेल्या महिन्याभरात शेंगदाण्याच्या दरात मोठी उसळी दिसून येत असून किरकोळ बाजारात दर किलोमागे १५० ते १८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. महिनाभरापूर्वी शेंगदाण्याचा दर ११० ते १२० रुपये किलो होता. मात्र, सध्या दरात अचानक वाढ झाल्याने ग्राहकांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत असून घरगुती बजेट कोलमडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.सध्या घुंगरू प्रकारचा शेंगदाणा सुमारे १५० रुपये किलो दराने विकला जात आहे, तर स्पॅनिश शेंगदाणा १७० ते १८० रुपये किलो दराने विक्री होत आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या मते, बाजारात शेंगदाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून पुरवठा तुलनेने कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे.
तसेच साठेबाजी व वाहतूक खर्चात झालेली वाढही दरवाढीमागील कारणे असल्याचे सांगितले जाते.शेंगदाणा हा स्वयंपाकात व खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जात असल्याने दरवाढीचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे.
पुढील काही दिवसांत बाजारात आवक वाढल्यास दरात काही प्रमाणात स्थिरता येण्याची शक्यता मंचर येथील व्यापारी प्रवीण शिंदे पाटील व्यक्त केली आहे; मात्र सध्यातरी दर उच्चांकी पातळीवरच कायम असल्याचे त्यांनी सांगितले.





