शिरुर : मलठण ता.शिरूर येथील किराणा दुकानदार योगेश मनोहर दंडवते हे त्यांच्या किराणा दुकानासमोरून त्यांची फोर व्हिलर रोडवरून काढुन ती रिव्हर्स घेत असताना बाळु भिमाजी बरकडे व सावळेराम भिमाजी बरकडे (दोन्ही रा. दत्तनगर मलठण ता शिरूर ) यांनी त्यांचाकडील मोटर सायकलने पाठीमागुन दंडवते यांच्या कारला धडक दिल्याच्या कारणावरून एकाने दगड फेकुन मारून तर दुसऱ्याने हाताने मारहाण, शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. याप्रकरणी योगेश दंडवते यांनी फिर्याद दाखल करून शिरूर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.31 जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास योगेश दंडवते हे त्यांची फोर व्हीलर टोयटा ग्लान्झा कंपनीची कार क्र. एम एच.12 व्ही. एन 3999 हि मलठण येथे शिवहनुमान किराणा दुकानासमोररून रोडवरून काढुन ती रिव्हर्स घेत होते. यादरम्यान बाळु भिमाजी बरकडे व सावळेराम भिमाजी बरकडे दोन्ही (रा. दत्तनगर ,मलठण ता. शिरूर ) यांनी संगनमत करून त्यांच्याकडील मोटर सायकलने पाठीमागुन कारला धडक दिल्याच्या कारणावरून दंडवते यांना बाळु भिमाजी बरकडे यांनी दगड फेकुन मारून शिवीगाळ केली. व सावळेराम भिमाजी बरकडे यांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली आहे. या घटनेचा पुढील तपास टाकळी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार शरद वारे करत आहेत.