‘सीआरपीएफ’च्या जवानांवर ग्रेनेड हल्ला
Updated On:

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात सुरक्षा कर्मचार्यांसह चार जण जखमी झाले.
ताज्या माहितीनुसार रविवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी प्रताप पार्क, लाल चौकात ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाने परिसराची नाकेबंदी केली असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
(सविस्तर बातमी प्रतीक्षेत)





