पुणे जिल्हा | आंबेगाव वसाहतीमध्ये यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव वसाहत (ता.आंबेगाव) येथे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची १११ वी जयंती यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाशराव घोलप, सरपंच प्रमिला घोलप, उपसरपंच परविन पानसरे ,ग्रामपंचायत सदस्य मिलिंद भांगरे, विजय घोलप, युवराज तारडे, मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीचे औचित्य साधून आंबेगाव वसाहतीमधून यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत व यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने काढण्यात आली. आंबेगाव वसाहतीमध्ये रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा आणि बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली.
यामध्ये आंबेगाव वसाहतील ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हस्ताक्षर स्पर्धेतील विजेते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेगाव वसाहत – प्रथम क्रमांक, कार्तिकीय किशोर सोमवंशी द्वितीय क्रमांक, सृष्टी मनोजकुमार सरदार – तृतीय क्रमांक मिळाला. तर, ज्ञानेश्वरी बाळू भालेराव हिला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले. तेजस्विनी अंकुश गवारी – (मोठा गट) प्रथम क्रमांक, ध्रुव सुरेश कापडणीस -द्वितीय क्रमांक,
अष्टमी रवींद्र पानमंद – तृतीय क्रमांक तर, दर्शन विकास पराड व ईश्वरी प्रवीण लोहकरे यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीचे नियोजन वंदना मंडलिक, लक्ष्मी वाघ, गौरी विसावे, राधिका शेटे, वैभव गायकवाड, संतोष पिंगळे, लक्ष्मण फलके व सुभाष साबळे यांनी केले. संजय वळसे यांनी प्रास्ताविक केले. वैशाली काळे यांनी आभार मानले.





