Pimpri : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

चांदखेड :लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मावळ तालुका शिवसेनेकडून वडगाव मावळ पंचायत समिती येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे तालुका पातळीवरील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक अन्यायाविरोधात आपल्या लेखणीने आणि लोककलेच्या माध्यमातून लढा देणाऱ्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचे स्मरण करत मावळ तालुका शिवसेनेने त्यांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाला शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजुभाऊ खांडभोर, संघटक चंद्रकांत भाऊ भोते, उपतालुका प्रमुख रामभाऊ सावंत व सोमनाथ कोंडे, युवासेना लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, तालुका युवासेना प्रमुख राजेश वाघोले, विभाग प्रमुख सहादू बडेकर, नवनाथ हरपुडे, मा. सरपंच संदिप शिंदे (साते) आणि प्रसिद्धी प्रमुख यश कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





