Nagar: सावित्रीबाई फुलेंना साईयोग फाऊंडेशनचे अभिवादन

राहाता: पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, समाज उद्धारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ९४वी जयंती साईफाउंडेशनने साजरी केली. यावेळी महिला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून यशवी राजेंद्र दायमा हिने सी.ए.परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रवीण खंडिझोड, अरुण मोकळ, राजेश दायमा, ॲड दत्तात्रय धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळासाहेब गाडेकर यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी मानले.
याप्रसंगी बाळासाहेब सोनवणे, साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, माजी सैनिक भानुदास गाडेकर, माजी नगरसेविका अनुराधा तुपे, सुष्मिता चव्हाण, कांचन बावके, उज्वला गाडेकर, नीलम चेनुके, आशा पिपाडा, पुष्पांजली दायमा, सुनिता बोबडे, ॲड.गोरख दंडवते, विलास वाळेकर, भाऊसाहेब बनकर, मोहन तांबे, मनोज पिपाडा, बबलू फटांगरे, संजय वाघमारे, संजय बाबर, अनिल सातव, दीपक दंडवते, व्यंकटेश अहिरे, उमेश लुटे, दीपक गाडेकर, विठ्ठल निर्मळ, संतोष बावके, पांडुरंग गायकावड, बाळासाहेब तारगे, रंगनाथ सदाफळ, विष्णू गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.





