पुणे जिल्हा | तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्रीराम विद्यालयाचे घवघवीत यश

मंचर, (प्रतिनिधी) – पिंपळगाव खडकी (ता.आंबेगाव) येथील श्रीराम विद्यालयाच्या सतरा वर्षाखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तसेच वैयक्तिक खेळ प्रकारात संस्कार किरण लायगुडे याने तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विद्यालयाच्या १७ वर्षे वयोगटातील विद्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकावला. अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली.
संस्कार किरण लायगुडे याची देखील जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख बी. एस. बांगर व सर्व शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी खेळाडूंचे मुख्याध्यापक बी. एस. कुतवळ, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सद्स्य, विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, माजी विद्यार्थी संघ, विविध संस्थाचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





