“दादा टोकण दिले…फोटोसुद्धा काढले…आता रेमडेसीवर कधी देणार..?” 

Updated On:

पुणे- सध्या करोना रुग्णांना गंभीर परिस्थितीत उपयोगी ठरणारे रेमडेसीवर इंजेक्शन मिळण्यासाठी शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या ऑफीस येथे काल सकाळी भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रेमडेसीवर इंजेक्शन देण्यासाठी टोकन देण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशीही येथे बसून असलेल्या पाटील यांनी टोकण दिलेल्या नागरिकांना ठेंगाच दाखविण्यात आला. त्या लोकांना इंजेक्शन काही निरोप सुद्धा मिळाला नाही.

अनेक जणांचे नातेवाईक दवाखान्यात अँडमिट असून काल सकाळी चमकोगिरी करत भाजप नेत्यांनी त्यांना कुपण देण्याचा कार्यक्रम करून फोटो देखील काढले. ते प्रसिद्ध करत प्रसिद्धी मिळविली मात्र कुपण मिळालेले काल दिवसभर केमिस्ट ऑफिस बाहेर थांबले. त्यांना नंतर उद्या येण्यासाठी सांगण्यात आले.

ते सर्व नागरिक आज सकाळी पुन्हा सात वाजल्या पासून रांगेत उभे आहेत. त्यांना अजूनही इंजेक्शन मिळण्याची कोणतीही खात्री मिळालेली नाही. त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांचावर रोष वक्त केला. आता तुम्हीच इथे या आणि इंजेक्शन उपलब्ध करून घ्या अशी मागणी केली

आणखी संबंधित बातम्या

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

2026-10-06 06:00:53

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही

2026-10-06 05:30:19

PMC News: ३ हजार ६३२ कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? महापालिकेच्या आर्थिक कारभारात मोठा घोळ; हिशेबच नाही