Amravati : सुवर्णकन्या कुमकुम मोहोडसह यशदिप भोगेचे जंगी स्वागत; अमरावतीत भव्य स्वागत रॅली
Amravati : जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य स्वागत रॅली

Amravati : जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांची कमाई करत देशासह अमरावतीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंचे आज अमरावतीत जंगी स्वागत करण्यात आले. तिरंदाजीमध्ये दोन सुवर्णपदक पटकावणाऱ्या कुमकुम मोहोड आणि कंपाऊंड धनुर्विद्येत रौप्यपदक मिळवणाऱ्या यशदिप भोगेच्या सन्मानार्थ जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य स्वागत रॅली काढण्यात आली.
महिला क्रिकेटपटू भारती फुलमाळी हिने सुवर्णपदक पटकावले असून, ती उपस्थित नसल्याने तिच्या वडिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या स्वागत रॅलीत प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, अमरावतीच्या मातीतून आर्चरीचे धडे घेतलेल्या अवघ्या १७ वर्षांच्या कुमकुम मोहोदने आशियाई स्पर्धेत भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाच्या अनुभवी ओह येजिनचा पराभव करत कुमकुमने महिला वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
अमरावतीमध्ये बांबूच्या कामठ्यांपासून तयार केलेल्या धनुष्यावर सराव करणाऱ्या या मुलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या मेहनतीचे आणि सातत्याचे हे यश मानले जात आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा:





