Amravati Hospital Fire: “अमरावतीमधील दुर्घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश दिले”; बावनकुळेंकडून पालकांचे सांत्वन अन् तपासाची ग्वाही
Amravati Hospital Fire: मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे - चंद्रशेखर बावनकुळे

Amravati Hospital Fire: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षात आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कक्षात अडकलेल्या सहा बाळांना परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बाहेर काढले असून, त्यांच्यावर शेजारील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या दोन परिचारिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बाळांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र यात तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान, आगीची तीव्रता इतकी होती की, नवजात शिशू कक्षातील एसी आणि इतर उपकरणे जळून खाक झाली.
चंद्रशेखर बावनकुळेंची पोस्ट –
या घटनेनंतर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले आहे. “अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे. दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो.
या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय सहायता दिली जात असून, त्यांना लवकर आराम पडावा अशी सुविधा दिली जात आहे.
मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभे असून, सरकार व प्रशासन संपूर्ण मदत करत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत. प्रशासन पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटले आहे.
अमरावतीमधील आजच्या दुर्घटनेमुळे मी खूप दुःखी झालो. माझे मन हेलावून गेले आहे.
दगावलेल्या नवजात बालकांना अतिशय व्यथित अंतःकरणाने श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांच्या पालकांना हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर देवो, अशी प्रार्थना करतो.
या घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मी दिले आहेत. जे…— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 24, 2026
“जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे चार वाजता लागलेल्या आगीत उपचार घेत असलेल्या तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. काही बालकांना पुढील उपचारांसाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांपैकी चार बालकांवर उपचार सुरू असून, एक गंभीर आहे.
आग लागताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत इतर बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आगीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. एसएनसीयूमध्ये कमी दिवसांचे, कमी वजनाचे आणि गंभीर अवस्थेतील नवजात बालकांवर उपचार सुरू असतात. मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या घटनेचे तीव्र दुःख व्यक्त करतो,” असे बावनकुळे यांनी पोस्ट करत लिहिले आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालयाची ही इमारत अवघ्या वर्षभरापूर्वीच सुरू झाली होती. त्यामुळे आग लागल्यानंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित का झाली नाही, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
हेही वाचा:





