शिरूर : शिरूर- हवेली विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रमुख प्रदीप कंद, पवार शांताराम कटके, जगदिश पाचर्णे ,संजय पाचंगे या चार मातब्बारांसह १४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. निवडणूक रिंगणात आता एकुण ११ उमेदवार उभे राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी बाळासाहेब म्हस्के यांनी पत्रकार परीषदेत शिरुर तहसिल कार्यालय येथे दिली आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज कोण- कोण मागे घेतील यावर बरीच राजकीय गणिते अवलंबून होती. भारतीय जनता पार्टीचे बंडखोर प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बंडखोर शांताराम कटके, जगदीश पाचर्णे, समता पार्टीचे भाऊसाहेब जाधव, शिवाजी कुऱ्हाडे रासप, सुजाता पवार, मनीषा कटके अपक्ष, शिवाजी कदम, प्रकाश जमदाडे, सुरेश वाळके, पंढरीनाथ गोरडे, गणेश दाभाडे, संजय पाचंगे, मारुती वाघचौरे या १४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान, शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार असून या विधानसभा निवडणुकीत जास्तीत-जास्त मतदारांनी मतदान करावे असे आव्हान शिरूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर केले आहे. उमेदवारांची नावे व चिन्ह : १ ) अशोक रावसाहेब पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (महविकास आघाडी), तुतारी २ ) ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष (महायुती) घड्याळ ३ ) विशाल शंकर सोनवणे बहुजन समाज पार्टी हत्ती ४) नाथाभाऊ पाचर्णे,बहुजन मुक्ती पार्टी, खाट ५ ) तुकाराम डफळ सैनिक समता पार्टी , ट्रंपेट ६ ) दत्तात्रय काळभोर,अपक्ष गॅस सिलेंडर ७ ) चंद्रशेखर घाडगे, संभाजी ब्रिगेड शिट्टी ८ ) अशोक रामचंद्र पवार, अपक्ष अंगठी ९ ) अशोक गणपत पवार, अपक्ष, रोड रोलर १० ) विनोद वसंत चांदगुडे, पेनाची नीब ११ ) राजेंद्र वाल्मीक कांचन , किटली