Gramin News : ‘कसा दारूबंदी करतो तेच बघतो…’; धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

शिरूर : आण्णापुर ता. शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज (वय ३७ वर्षे ) यांना ‘तुझा तर कार्यक्रम करतो, तु दारुबंदी कशी करतो तेच बघतो…. तुझ्यावरअॅट्रॉसिटी दाखल करतो’ अशी धमकी देत शिविगाळ केली आहे. या प्रकरणी गोविंद उर्फ माया भाई रा. अण्णापूर यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी निलेश वाळुंज व त्यांची आई मंदा यशवंत वाळुंज असे दोघे जण घरासमोर अंगणात उभे असताना गोविंद जगताप हा घरासमोर आला.
व त्याने निलेश वाळुंज यांच्या आईकडे पाहून हातवारे करून म्हणाला की, तुझे मुलाला काय रात्री लई माज आला होता काय आता बोलवना पोलिसांना काय माझी वाकडे करणार आहे.” असे म्हणुन परत रात्री झालेल्या प्रकार प्रमाणे मला तुझा तर कार्यक्रम करायचाय असे म्हणत मग कसा दारूबंदी करतो तेच बघतो.
तुझ्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो असे म्हणाला. सदर ठिकाणी निलेश वाळुंज यांची आई मंदा यशवंत वाळुंज हिच्याकडे अश्लील हातवारे करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न झाल्याने ते घरामध्ये निघून गेली आहे. त्यानंतर निलेश वाळुंज यांनी शिरूर पोलीस निरीक्षक यांना फोन करून माहिती दिली.
थोड्या वेळाने पोलीस गावामध्ये आले त्यावेळी तो त्या ठिकाणावरून निघून गेला आहे. या प्रकरणी गोविंद उर्फ माया भाई दशरथ जगताप राहणार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास आगलावे हे करत आहे.





