Gramin News : हाय व्होल्टेज तारेचा शॉक बसून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर – रामलिंग गावच्या हद्दीतील गट नं. २५ ग्रीन पार्क हॉटेलच्या पाठीमागे लॅन्ड डेव्हलपर्सच्या ऑफिसचे बांधकाम होत असताना कोणतीही काळजी न घेता, महावितरणची परवानगी न घेता हाय होल्टेजच्या तारेच्या खाली सेंट्रीगचे काम सुरु असताना शॉक लागून राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया ( वय ४६ वर्ष) या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३० सप्टेबर रोजी राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया हे सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास रामलिंग रोडवरील साईटवर सेंट्रींगचे कामावर गेले होते. दुपारी ४:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सुधीर राधेश्याम चौरासिया (वय २४ वर्षे) हा शिरूर येथे जेनेरिक मेडीकल येथे असताना त्याला अनिल घावटे यांचा मला फोन आला.
त्यांनी त्याला सांगितले की तुझे वडील राधेश्याम महेशप्रसाद चौरासिया (वय ४६) वर्षे यांना बांधकामाच्या साईटवर असताना इलेक्ट्रिक लाईटचा शॉक लागला आहे. तेव्हा लगेच रामलिंग येथे वडीलांचे काम चालु असलेल्या ठिकाणी मुलगा गेलो असता त्याला त्याचे वडील तेथे बेशुध्द अवस्थेत पडलेले होते.
त्यांना जमलेल्या लोकांच्या मदतीने उचारासाठी ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे आणले असता तेथिल डॉक्टरांनी राधेश्याम चौरसिया यांना तपासुन ते औषधोपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत सुधीर राधेश्याम चौरसिया यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिरी हे करत आहे.
सदर डेव्हलपर्सने पोल व तारा शिफ्टिंग साठी महावितरण कडे अर्ज केला होता. परंतु त्याबाबतचे ते काम प्रलंबित होते. परवानगी न घेता पोल व तारा शिप्ट न करता डेव्हलपर्सने काम काम सुरू केल्याचे शिरूर महावितरचे ऊपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी सांगितले आहे.
हाय होल्टेजच्या ताराखाली धोकादायकरीत्या काम केल्यामुळे हा अनर्थ घडला आहे. त्यामुळे आता महावितरण विभाग शिरूर व पोलीस स्टेशन काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





