Gramin News : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर धमाकेदार कामगिरी

इंदापूर : युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय खेळ संवर्धन संस्थेची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीयपातळी वरील ॲथलेटिक्स कबड्डी स्पर्धा, त्यागराज स्टेडियम न्यू दिल्ली या ठिकाणी संपन्न झाल्या व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी सर्व राज्यातील जवळपास 4000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
यामध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल तसेच विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लाखेवाडी च्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळवले आहे. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे तसेच पालकांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले, हर्षवर्धन खाडे, प्रदीप गुरव, राजेंद्र सरगर, गणेश पवार, सम्राट खेडकर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि अभिनंदन केले.
तीन सिल्व्हर मेडल, व 3 ब्रॉंझ मेडल चे मानकरी ठरले विदयार्थी :
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर धमाकेदार कामगिरी केली असून, या संस्थेचे विदयार्थी तीन सिल्व्हर मेडल व 3 ब्रॉंझ मेडल चे मानकरी ठरले आहेत.
08 वर्ष वयोगट मुली 50M/100M :
स्वरा डोंगरे – सिल्व्हर मेडल
10 वर्ष वयोगट मुली 50M रनींग :
आराध्या खेडकर – ब्रॉंझ मेडल भाला फेक 19 वर्ष मुले
क्षितज जगताप – ब्रॉंझ मेडल 800 M 19 वर्ष मुले
अंकित मोहिते – सिल्व्हर मेडल 17 वर्ष कबड्डी ब्रॉंझ मेडल
प्रतीक जाधव – ब्रॉंझ मेडल 100M चतुर्थ क्रमांक
ऋतुराज मासाळ – लांब उडी
पृथ्वी धनवडे – चतुर्थ क्रमांक





