Gramin News : चतुर्थी दिनी घेतले लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन !

ओझर : अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त लाखो भाविकांनी विघ्नहराच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे विश्वस्त, विलास कवडे, संतोष कवडे, विनायक मांडे, शिल्पाताई जगदाळे यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शानासाठी मंदिर खुले करण्यात आले.
मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान अमित कुटे ,उमेश थोरात, सारंगधर शिंदे, शुभम सोनवणे, साईनाथ ठाकरे, व श्री विघ्नहर विद्यालय ओझर येथील इयत्ता १० वी मधील प्रथम पाच क्रमांक मिळवलेले प्रथम पाच विद्यार्थी यांना मिळाला. त्यामध्ये कार्तिकी कवडे,९2.८०%, वरद कवडे ९१.८०% , अथर्व कवडे ९०% , श्रेया देशमुख ९०% ,वेदांत भोर ८८% , योगेश हाके ८७% ,आयुष बेनके ८७% यांचा श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने सत्कार करण्यात आला.
पहाटे पाच ते रात्री आकरापर्यंत रांगेत सुमारे एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.३० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली.
आज संकष्टी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरस विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता. तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आले. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प.संतोष महाराज सस्ते पिंपळगाव जोगा यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली.
तसेच यावेळी आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे , उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त, प्रकाश मांडे , सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे ,विक्रम कवडे, समिर मांडे , विनायक मांडे , संतोष कवडे , विलास कवडे , विनायक जाधव, मंगेश पोखरकर, शिल्पा जगदाळे यांनी केले.





