Gramin News : ‘गुणवत्ता व संस्कार जपणारी संस्था गुरुकुल विघा मंदिर’ – आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूर – पुणे जिल्ह्यात व राज्यात ज्या शिक्षण संस्थेची चर्चा होते. ती चांगली चर्चा, गुरुकुल विद्या मंदिर संस्थेच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची असते. गुणवत्ता संस्कार या संस्थेने जपले असून, खूप चांगले विद्यार्थी येथे घडतात याचा मला आनंद आहे. अशी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील गुरुकुल विद्या मंदिर गोखळी येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान, शुक्रवार (ता.६ सप्टेंबर) रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे होते.
यावेळी विद्यार्थी व पालकांना तसेच शिक्षकांना आमदार भरणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील, संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ, संस्थेचे कार्यकारी संचालक भरत हरणावळ, हनुमंत कोकाटे, संजय दोशी, शशिकांत तरंगे, शिवाजीराव तरंगे, संदेश देवकर, बाळासाहेब शिरसागर ,सुरेश शिंदे, दशरथ जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
चांगलं शिक्षण देणाऱ्या संस्थेला, चांगले ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना,भेटले पाहिजेल.हा माझा ध्यास होता. म्हणूनच मुद्दामहून मी आलो आहे. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ मनापासून विद्यार्थी घडवण्याचे काम करत आहेत. गरीब कुटुंबातील विद्यार्थी घडला पाहिजे ही भूमिका या संस्थेची आहे. माणसाच्या आयुष्यात सहजासहजी गोष्टी कोणत्याही प्राप्त होत नाहीत. यासाठी कष्ट लागते, मेहनत लागते. हे कष्ट आणि मेहनत संस्था उभारणी कामी आणि विद्यार्थी घडवण्यासाठी हरणावळ बंधू देत आहेत.याचे मला समाधान तालुक्याचा आमदार म्हणून मनोमन आहे.असेही प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
प्रस्ताविकात बोलताना संस्थेचे संस्थाप्रमुख बाळासाहेब हरणावळ म्हणाले की,संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेवर आपट प्रेम केलेले आमदार दत्तात्रेय भरणे आहेत. गुरुकुल विद्या मंदिरच्या शिक्षकांना मला भेटायचे आहे. त्यांचे कौतुक करायचे आहे. असा मला मामांचा निरोप मला होता. २०१६ सालात स्थापन झालेली संस्था आज नर्सरी पासून उच्च शिक्षणापर्यंत तब्बल तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या संस्थेत फक्त इंदापूर तालुक्यातील मुले शिकत नाहीत तर, राज्यभरातून मुले शिकण्यासाठी दाखल आहेत.या संस्थेला फक्त पन्नास गुंठे क्षेत्र पहिले होते.सर्वांच्या मदतीने तब्बल सहा एकर क्षेत्र या संस्थेला झाले आहे.
येणाऱ्या कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे,मोठी इमारत संस्थेची उभी करायची आहे. संस्था उभारणीनंतर मी मामांना भेटलो. या शाळेतून घडला जाणारा विद्यार्थी घडला जाणारा विचार अनेक वर्ष टिकणार आहे. म्हणून जी लागेल,ती मदत संस्थेला करेल बांधकाम बंद करू नका.या शब्दावरच संस्थेची यशस्वीरित्या उभारणी झाली. असे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांनी काढले.
उपस्थितांचे स्वागत संस्थेचे कार्यकारी संचालक भरत हरणावळ, मुख्याध्यापक विश्वास हुलगे, सुरेश वरकड, रमेश गोफणे, प्रविण नेही, संदिप बारवकर, आश्विनी नरुटे सुतार व सर्व शिक्षकांनी केले. तर आभार भरत हरणावळ यांनी मानले.





