Gramin News : गुरुकुलचे संस्थापक गौरवले ! राष्ट्रीय ‘आदर्श पुरस्कारा’ने बाळासाहेब हरणावळ सन्मानित

इंदापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मपीठ यांच्यावतीने देण्यात येणारा अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार तेलंगणा राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्माजी व महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे गुरुकुल शिक्षण संस्था गोखळी चे संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांना प्रदान करण्यात आला.
बाळासाहेब हरणावळ यांनी स्थापन केलेल्या गुरुकुल मधून,शिक्षण हे केवळ ज्ञान प्राप्तीचे साधन नसून,समाजाच्या विकासाचा कणा आहे. याला प्रमाण मानून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व तयारी तसेच त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी बळ म्हणजेच गुरुकुल विद्यामंदिर, गोखळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगवाडी या ठिकाणी सहशिक्षक ते गुरुकुल विद्यामंदिर गोखळी संस्थापक व अध्यक्ष हा एक शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास बाळासाहेब हरणावळ यांचा पाहण्याजोगा आहे. राहत्या घरात ३२ मुलांना सोबत घेऊन सुरू केलेल्या शैक्षणिक संकुलात जवळपास तिन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या कार्यांची दखल पुरस्कार देताना घेण्यांत आली आहे.
येथिल शिक्षण संस्थेचे इयत्ता पहिली ते बारावी मधील सर्व इयत्तांसाठी स्कॉलरशिप,नवोदय,सातारा सैनिक, डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा तसेच एम टी एस आणि एनटीएस या सर्व परीक्षांची तयारी करून घेतली जाते. शैक्षणिक वर्ष २०२४ मध्ये एकाच वर्षात वैद्यकीय ५४ विद्यार्थ्यांपैकी १६ MBBS, ४ BVSC,१५ BAMS निवड झाली होती.
व अभियांत्रिकी साठी पाच आयआयटी पाच एनआयटी एक सीओईपी व तीन एमआयटी साठी निवड. व २०२५ मध्ये सुद्धा जेई मेन्स मध्ये २४ विद्यार्थी ९० पेक्षा जास्त असल्याने, संस्थापक बाळासाहेब हरणावळ यांनी पाहिलेल्या स्वप्नांना यशाचे अंकुर फुटायला लागल्याने,राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ची दखल पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपिठाने घेतल्याचे सांगितले.





