Gramin News: शिरूर शहरामध्ये ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा गजाआड

शिरूर – शिरुर शहरामधील पोद्दार पार्कीगमध्ये उभ्या असलेल्या चार ट्रकच्या मध्यरात्री तब्बल सात बॅटऱ्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या होत्या. यामुळे शिरूर शहरामध्ये खळबळ माजली होती. शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप यांनी या चोरी बाबत तपास सुरू केला असता,
तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज तपासून पारधी वस्ती पाण्याची टाकी शिरूर येथील एक संशयित आर्यन एअरपोर्स पवार ( वय.१९ वर्ष ) यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर गुन्ह्यातील गेलेला माल शिरूर पोलिसांनी त्याच्याकडून तात्काळ जप्त केला आहे. या कामी जगताप यांना शिरुर पोलिस स्टेशनचे पो. अंमलदार नितेश थोरात, रघुनाथ हाळनोर, पवन तायडे यांनी मदत केली आहे.
एका रात्रीत चार ट्रकच्या तब्बल सात बॅटऱ्या चोरणारा चोरटा आर्यन एअरपोर्स पवार याला गजाआड केले आहे. पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करून नाथसाहेब जगताप यांनी आरोपी गजाआड केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.





