चिंबळी : मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर मुलांना लहानपणापासूनच व्यायामाची गरज असून हे काम पालकांनी आपल्या मुलांना दिले पाहिजे असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चिंबळी येथे केले. चिंबळी (ता खेड) येथील माजी उपसरपंच राहुल चव्हाण यांच्या परिवातर्फे व पुणें जिल्ह्या नॅशनल कमांडो फाऊंडेशन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आदित्य आक्टोविटीज अँड मल्टीपर्पज हाल चे उद्घाटन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चव्हाण परिवाराच्या वतीने माजी सभापती विलास कातोरे उपसरपंच राहुल चव्हाण सामाजिक कार्यकर्ते भाऊबली चव्हाण यांच्या हस्ते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन जीवन जैद व्हाचेअरमण प्रवीण चव्हाण, माजी चेअरमन अर्जुन जाधव, साखरचंद लोखंडे, हिरामण बहिरट, सत्यवान जैद, अमृता जाधव, कातोरे , लंकेश पाटारे, सुमित जाधव ,रोहित अवघडे, दिपक पाटोळे यांच्यासह सरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.