इंदापूर : इंदापूर तालुक्यातील मच्छीमारांचे अनेक प्रलंबित प्रश्न असून, हे प्रश्न शासनाच्या माध्यमातून निकाली काढण्यासाठी तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठेही कमी पडणार नाही. जी मदत शासनाच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना करता येईल, ती करण्यात करणार अशी ग्वाही राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली. इंदापूर तालुक्यातील मच्छिमारांच्या विविध मागण्या आणि समस्या निवारण्याकरिता (ता.२३ रोजी) सकाळी १ १वाजता सर्किट हाऊस पुणे येथे आमदार भरणे यांच्या अध्यक्षतेखाली विषेश बैठक आयोजित करणेत आली होती. सदरील प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय तथा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय इतर अधिकारी वर्ग व इंदापुर तालुक्यातील मच्छिमारांचे प्रतिनिधी, तसेच मच्छिमार मोठयां संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये इंदापुर तालुक्यातील मच्छिमारांनी नायलॉन सुती जाळी मागणीच्या अनुशंगाने दाखल केलेल्या प्रस्तावांबाबत विचारणा केली. त्याबद्दल निधी उपलब्ध करणेबाबत आमदार भरणे यांनी प्रादेशिक उपायुक्त मत्स्यव्यवसाय तथा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पुणे यांना सूचना केल्या. त्यानुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत त्वरित निधीची मागणी करण्याबाबत निर्देश दिले. उजनी जलाशयात नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत राबविण्यात येणा-या मत्स्यबोटुकली संचयन कार्यक्रमाबाबत विचारणा करून,विहित नियमानुसार योजना त्वरित कार्यान्वित करणेबाबत आदेश दिले,तसेच उजनी जलाशयात मत्स्यबोटुकली संचयना पश्चात्त पुर्ववत मासेमारी ०१ किलो आकारा वरील बोटुकली दोन महिन्यानंतर करण्यात यावी. असे मत्स्य अधिकारी पुणे यांच्यामार्फत सुचित करण्यात आले. मत्स्य अधिकारी यांच्यामार्फत सर्व मच्छिमारांना अपघात गट विमा योजनेच्या लभांकरीता कार्यालयात अर्ज दाखल करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व मच्छिमार यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. तसेच नायलॉन, सुती जाळ्याचे प्रस्तावावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. बैठकीनंतर बोलताना आमदार दत्तात्रेय भरणे यांनी इंदापुर तालुक्यातील मच्छिमारांना शासकीय स्तरावरील सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला असुन, उजनी जलाशयात २८ वर्षानंतर मागील वर्षीपासून मत्स्यबोटुकली संचयन योजना आणून आपल्या मच्छीमार बांधवांना व्यवसाय उपलब्ध करून दिला आहे. संचयन प्रत्येक वर्षी नियमितपणे केले जाईल. त्यामुळे मच्छीमारांनी चिंता करू नये असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.