Gramin News: ‘आपटी गावाला कोट्यावधींचा निधी’ – प्रदीप कंद

कोरेगाव भिमा : शिरूर तालुक्यातील आपटी गावामध्ये विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम आज संपन्न झाला. आपटी ते पिंपळे जगताप शिव रस्ता १० लक्ष रुपये, आपटी ते पिंपळमाथा १० लक्ष रुपये, आपटी वेग्रे गावठाण अंतर्गत रस्ता १० लक्ष रुपये असा एकूण ३० लक्ष रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी बोलताना सांगितले कि,
आपटी गावासाठी या आधीही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शाळेसाठी सुरक्षाभिंत, ग्रामपंचायत व बाळभैरवनाथ मंदिर परिसर सुशोभीकरण, हातपंम्प, भजनी मंडळास साहित्य, व्यायामशाळेसाठी साहित्य असा करोडो रुपयांचा निधी दिल्याची आठवण प्रदीप कंद यांनी करून दिली.
यावेळी पुणे जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपा क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भोंडवे, आपटी गावचे सरपंच अतुल मुरकुटे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अमित सोनवणे, नवनाथ खांदवे, डींग्रजवाडी चे माजी सरपंच राहुल गव्हाणे, आपटी गावच्या उपसरपंच रोहिणी गोसावी,माजी सरपंच सुनीता शिवले,रुपाली ढगे, माजी उपसरपंच रेणुका गाडेकर, ग्रामपंचायत सदस्य सचिन कानगुडे, बाळासाहेब ढगे, ग्रामविकास अधिकारी शंकर भालके,सोसायटी चे चेअरमन निलेश सदाशिव शिवले यांसह आपटी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे साहेबांची आठवण
आपटी हे शिरूर तालुक्यातील शेवटचे गाव, गावची मतदार संख्या कमी असल्याने गावाकडे दुर्लक्ष होत असताना तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे साहेबांनी वढु ते आपटी रस्त्यांसाठी भरीव निधी दिल्याने गावातील मुख्य रस्त्याचा प्रश्न मिटल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी व शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी मोलाची मदत झाल्याने दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांचे देखील आपटी गावच्या विकासात मोलाचे योगदान असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या भाषणावेळी सांगितले.





