Gramin News : गांजा सेवनप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल,शिरूर पोलिसांची कारवाई

शिरुर : शिरूर शहरातील कुंभार आळी येथील घोडनदीच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी आडोशाला ५ जण गांजा (अंमली) पदार्थाचे सेवन करत असताना साहित्यासह मिळुन आले आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रघुनाथ भिमराव हाळनोर यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी सविस्तर हकीकत अशी की, शिरूर शहरातील दशक्रिया घाटाजवळ दि. ११ सप्टेंबर रोजी आडोशाला इसम १)आसीफ रफिक शेख (वय २७ वर्ष )रा. हल्दी मोहल्ला,शिरूर, २)वशीम इक्बाल शेख ( वय ३२ वर्ष )रा. हुडको काॅलनी शिरूर, ३) उमेश संभाजी गडकर (वय ३२ वर्ष )रा. गुजरमळा शिरूर,
४) दत्तात्रय काशीनाथ गुळादे ( वय ४३वर्ष ) रा. साईनगर शिरूर, ५ ) दिनेश राम लोखंडे (वय २८ वर्ष) रा. सिध्दार्थनगर शिरूर हे गांजा या अंमलीपदार्थाचे सेवन करण्याचे साहीत्य मातीची चिलीम त्यामध्ये मळकट कापडी चिंधी, माचीस बॉक्स या साहीत्यासह अंमली पदार्थाचे सेवन करत असताना मिळुन आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे हे करत आहे.
हे देखील वाचा…
घरात गांजा सापडणे हा किती मोठा गुन्हा? कोणकोणत्या कलमाद्वारे शिक्षा होऊ शकते, वाचा सविस्तर….





