Shikrapur News : ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता : डॉ. दिलीप देशमुख
Shikrapur News : शहरांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांमध्ये संघर्ष करण्याची क्षमता आणि विज्ञानाची भूक अधिक तीव्र असते

Shikrapur News : शहरांपेक्षा ग्रामीण भागातील मुलांमध्ये संघर्ष करण्याची क्षमता आणि विज्ञानाची भूक अधिक तीव्र असते त्यामुळे त्यांच्यात अफाट बुद्धिमत्ता असते असे मत इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे कोअर टीम मेंबर डॉ. दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले. (Shikrapur News)
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून चाटे फाउंडेशनच्या वतीने ग्राम शिक्षण नेता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला शिरूर व हवेली परिसरातील विविध नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षण प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Shikrapur News)
उपस्थितांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्वयंअध्ययनाची संस्कृती रुजवण्यासाठी आपापल्या शाळांमध्ये ‘६० मिनिटे स्वाध्याय पॅटर्न प्रभावीपणे राबवण्याचा एकमुखाने निर्धार व्यक्त केला. या परिषदेत डॉ. दिलीप देशमुख बोलत होते. (Shikrapur News)
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. कलाम यांचे स्वप्न होते की देशातील प्रत्येक खेड्यापर्यंत विज्ञानाची दृष्टी पोहोचली पाहिजे. जर या विद्यार्थ्यांना योग्य दिशा, सातत्यपूर्ण स्वाध्याय आणि वैज्ञानिक मार्गदर्शन मिळाले तर ते नक्कीच इस्रो, नासा आणि जागतिक संशोधन संस्थांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करतील. (Shikrapur News)
चाटे फाउंडेशनने सुरू केलेला ग्राम शिक्षण नेता हा उपक्रम ग्रामीण शिक्षणाची दशा आणि दिशा बदलणारा ठरेल. चाटे फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी अवकाश विज्ञान प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Shikrapur News)
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी केवळ योग्य मार्गदर्शनाअभावी आणि अभ्यासात सातत्य नसल्याने मागे पडतात, ही दरी भरून काढण्यासाठी ग्राम शिक्षण नेता हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये दररोज ६० मिनिटे स्वतःहून अभ्यास करण्याची सवय रुजवली जात आहे. (Shikrapur News)
चाटे फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम पूर्णपणे विनामूल्य राबवला जात असून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, वैज्ञानिक विचार आणि नेतृत्वगुणांचे धडे दिले जातील असे चाटे फाउंडेशनचे संस्थापक प्रा. कैलास चाटे यांनी सांगितले. (Shikrapur News)





