5 हजार रुपये लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले
Updated On:

नवी मुंबई: राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाचखोर सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा वेग वाढवला आहे. नवी मुंबईतील पेण तालुक्यातील मळेघर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक परमेश्वर सवाईराम जाधव याला 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले.
घराचा असेसमेंट उतारा देण्यासाठी त्याने ही रक्कम मागितली होती. एसीबीच्या कारवाईने महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. यापूर्वी सोलापूरच्या बार्शी तालुक्यातही दोन महसूल कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक झाली होती.
टॅग्स:




