गोविंदाच्या पत्नी सुनीता अहूजा ट्रोल; हेल्परसोबत दारू खरेदी करतानाचा ब्लॉग चर्चेत

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहूजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांपासून दूर राहण्यासाठी आणि मन रमवण्यासाठी सुनीता अहूजाने नुकताच ब्लॉगिंगमध्ये पाऊल टाकले. तिने सोशल मीडियावर आपला पहिला ब्लॉग शेअर केला, पण हा ब्लॉग तिच्यासाठी चांगल्यापेक्षा वाईट ठरला आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.
या व्हिडिओ ब्लॉगमध्ये सुनीता अहूजा आपल्या हेल्परसोबत मस्ती करताना दिसत आहे. कधी ती दारू खरेदी करताना, तर कधी बाईकची सवारी करताना दिसते. या सगळ्या गमती-जमती करताना सुनीताची अवस्था बिकट झाली आणि तिचा हेल्पर तिची मजा घेताना दिसला. लोकांनी तिच्या या ब्लॉगची तुलना दिग्दर्शिका फराह खानच्या ब्लॉगशी केली आणि तिला “सस्ती कॉपी” म्हणत टीका केली.
स्वतः सुनीता अहूजाने ब्लॉगमध्ये स्पष्ट केलं आहे की, तिला अशा टीकेचा काहीही फरक पडत नाही. ती म्हणाली, “गेल्या दीड वर्षांत लोकांनी माझ्याबद्दल खूप चुकीच्या गोष्टी केल्या, पण आता कुणालाही तसं करता येणार नाही.”
या पहिल्या ब्लॉगमध्ये ती मंदिरात दर्शनासाठीही गेली होती. पंडितांशी बोलताना ती भावूक होऊन रडली, पण काही वेळातच स्वतःला सावरलं. सुनीता अहूजाचा हा ब्लॉग दाखवतो की, आयुष्यात अनेक अडचणी असूनही ती आनंदाने जगण्याचा प्रयत्न करत आहे.




