“कधीच माफ करणार नाही, तु कसा बाप आहेस”; गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा संतापली

Sunita Ahuja | बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा हे जोडपे पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. मागील काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोट आणि भांडणाच्या बातम्या सातत्याने समोर येत होत्या. सुनीता अनेक वेळा गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरही बोलली आहे. आता, तिने पुन्हा एकदा एक मुलाखतीत तिच्या पतीच्या अफेअरवर मत व्यक्त करत गोविंदाला खडेबोल सुनावले आहे.
मागील वर्षी गणेशोत्सवादरम्यान दोघे एकत्र दिसले होते. तेव्हा तिने आमच्या कोणतेही वाद, मतभेद नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाच्या अफवा शांत झाल्या होत्या, पण आता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या खासगी आयुष्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. Sunita Ahuja |
गोविंदाला माफ करणार नाही
अलीकडेच सुनीता मुलाखतीत म्हणाली की, “मी गोविंदाला माफ करणार नाही. मी नेपाळची आहे. जर मी माझी खुकरी काढली तर सगळे अडचणीत येतील. म्हणूनच मी म्हणतेय, आताचं सावध हो बेटा.” सुनीता गोविंदाच्या एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअर बोलताना म्हणते, “अशा मुली खूप येतात. पण तू थोडा मूर्ख आहेस. तू ६३ वर्षांचा आहेस. तू टीनाचं लग्न कर. यशचे करिअर धोक्यात आहे ते ठिक करायला त्याला मदत कर कसा बाप आहेस तू.” Sunita Ahuja |
View this post on Instagram
सुनीताच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांच्या अफवाही पुन्हा उठल्या आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त माध्यमांशी बोलताना तिने घटस्फोटाच्या अफवांचा खंडन केले होते.
“आमच्यात अंतर असते तर आम्ही असे उभे राहिलो असतो का? कोणीही आम्हा दोघांना वेगळे करू शकत नाही. वरून कोणीही आला तरी, माझा गोविंदा फक्त माझाच आहे आणि कोणाचाच नाही,” असे तिने म्हंटले होते. मात्र आता सुनीताच्या नव्या वक्तव्यांमुळे दोघांमधील काही मुद्दे अजूनही सुटलेले नसल्याचे समोर येत आहे. Sunita Ahuja |
हेही वाचा:





