“द कपिल शर्मा शो’मध्ये झळकणार गोविंदा

Updated On:
Photo 1

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद सतत चर्चेचा विषय ठरत असतो. हे दोघे मामा-भाचे कधीही समोरासमोर येत नाहीत. 

त्यातच गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा लवकरच “द कपिल शर्मा शो’मध्ये झळकणार आहेत. परंतु या ऍपिसोडमधून कृष्णा अभिषेक गायब होणार असल्याचे समजते.

कृष्णा अभिषेक सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त अहे. यामुळे तो शोच्या शूटिंगसंबंधी डेट्‌स ऍडजस्ट करत आहे. त्यातच या शोमध्ये गोविंदा येणार असल्याचे त्याला समजल्याने तो ऍपिसोडपासून दूर राहणार आहे.

असे दुसऱ्यांदा घडत असून, त्याने आपले मामा गोविंदा यांच्यासोबत “द कपिल शर्मा शो’मध्ये शूट करण्यास नकार दिला आहे. कृष्णाने एका मुलाखतीत सांगितले की, मी 15 दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपट आणि कपिलच्या शोसाठी रायपूर आणि मुंबई असा सातत्याने प्रवास करत आहे.

या शोसाठी मी डेट्‌स ऍडजस्ट करू शकतो. परंतु जसे या शोमध्ये ते (गोविंदा) येणार असल्याचे समजल्याने मी या ऍपिसोडपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, यापूर्वीही एकदा गोविंदा, त्याची पत्नी आणि मुलगा हे सर्वजण “द कपिल शर्मा’च्या सेटवर पोहोचले होते. तेव्हाही कृष्णाने त्या ऍपिसोडमध्ये काम केले नव्हते.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा