सेटवर लवकर येत नसल्याचा आरोपावर गोविंदा संतापला…

Govinda | अभिनेता गोविंदाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासह तो आपल्या डान्समुळे देखील लोकप्रिय आहे. एकाचवेळी तो पाच शिफ्टमध्ये काम करत असल्याचे देखील म्हंटले जाते. मात्र गोविंदा सेटवर कधीच लवकर येत नसल्याचा आरोप करण्यात आला. यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच गोविंदाने ‘टू मच विथ ट्विंकल अॅंड काजोल’ या शोमध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, अभिनेत्याने त्याच्या करिअरमध्ये घडलेल्या गोष्टींविषयी सांगितलं. सेटवर कधीच वेळेवर न आल्याच्या आरोपांवर गोविंदा म्हणाला, “मी वेळेवर येत नाही, म्हणून मला बदनाम केलं गेलं. मी म्हणतो, कोणामध्ये एवढी ताकद आहे की पाच शिफ्ट करून तो वेळेवर पोहोचू शकेल. हे शक्यच नाही, होऊच शकत नाही. एकाच वेळी पाच शिफ्टमध्ये काम करणारा माणूस कसा वेळेत पोहोचणार? इथे तर लोक एक चित्रपट करून थकून जातात.”
या शोची सूत्रसंचालिका ट्विंकल खन्नाने गोविंदासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. जेव्हा मी गोविंदासोबत काम करत होते, तेव्हा तो 14-14 चित्रपट एकाच वेळी करत होता, असं ती म्हणाली. चित्रपटाच्या सेटवर गोविंदा वेगवेगळ्या पोशाखांमध्ये यायचा, असाही खुलासा तिने केला. एकाच वेळी इतक्या चित्रपटांमध्ये काम करताना डायलॉग्स लक्षात राहायचे का, असा प्रश्न गोविंदाला विचारण्यात आला. Govinda |
त्यावर गोविंदा म्हणाला, “माझ्या सगळं लक्षात राहतं. किर्तीने मला खूप घाबरवलं होतं. चीची कोणत्याच प्लॅनिंगशिवाय चित्रपट करतोय, जर तो हिट झाला नाही तर त्याचं करिअर धोक्यात येईल. त्याच भीतीमुळे मी अधिक प्रामाणिक होऊन काम करू लागलो होतो,” असेही तो म्हणाला. Govinda |
गोविंदाने नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटे केले आहेत. ‘राजा बाबू’, ‘जोडी नंबर वन’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर 1’, ‘दुल्हे राजा’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यासारख्या हिट चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
हेही वाचा:
“नीतीश कुमार शिंदे नाहीत! मालकाच्या घरातून….; बिहारच्या बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंना डिवचलं





