अभिनेता गोविंदा-सुनिता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा, मॅनेजर म्हणाला – ‘येत्या दोन दिवसात…’

Govinda And Sunita Ahuja : बाॅलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. हे दोघेही लवकरच विभक्त होणार असल्याचा दावा केला जात आहे. या चर्चांवर सुनिताने अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. तर गोविंदाने सध्यातरी मी माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलेले आहे, असे म्हटले आहे. गोविंदा आणि सुनिता गेली 37 वर्षांपासून पती-पत्नी आहेत. दरम्यान, याच घटस्फोटाच्या चर्चेवर गोविंदाच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने घटस्फोटाच्या चर्चेवरही भाष्य केलं आहे.
‘या सर्व चर्चा सुनिताजींनी दिलेल्या मुलाखतीमुळे चालू झाल्या आहेत. तुम्ही सगळे गोविंदा यांना चांगल्या प्रखारे ओळखता. लग्न म्हटल्यावर रुसवे-फुगवे होतच असतात,’ असं गोविंदा यांचे मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले आहेत.
गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटासंदर्भात काही कायदेशीर प्रक्रिया पार पडलेली आहे का? असे विचारण्यात आले. यावर बोलताना “अशी कोणतीही प्रक्रिया पार पडलेली नाही. आपण सर्वांनी पुढचे एक ते दोन दिवस वाट पाहावी, अशी मी विनंती करतो,” असे आवाहनही शशी सिन्हा यांनी केले आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गोविंदा आणि सुनिता गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहात आहेत. सुनिता यांनी एका मुलाखतीत याबावर भाष्य केले आहे. गोविंदा यांच्या अफेअरच्या चर्चेनंतर सुनिता यांनी मुलाखतीत केलेल्या वेगवेगळ्या भाष्यांना कथित अफेअरशी जोडले जात आहे. दरम्यान, गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या फक्त चर्चा आहेत. यावर अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चेत काही तथ्य आहे की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईल.





