Major decision for Gen Z : ‘जेन-झीं’साठी सरकारचा ‘गेमचेंजर’ प्लॅन! 9 महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा
Major decision for Gen Z : आता स्थानिक पक्षांनीही या नव्या पिढीच्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी आत्तापासूनच रणनिती आखण्यासाठी सुरुवात केली आहे.

Major decision for Gen Z : नीट पेपरफुटीविरोधीत दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जनआंदोलन उभे केले होते. या लढ्यात विद्यार्थ्यांसाठी कॅाक्रेच जनता पार्टी मैदानात उतरली होती. अखेर लढ्याला मोठं यश धर्मेंद प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आलं.
सध्याच्या घडीला आंदोलन थांबले असले तरी विद्यार्थ्यांसाठी आगामी काळातही लढा उभा करू, असा इशारा देण्यात आला. या आंदोलनातून झेन झींविषयी जोरदार चर्चा देशभरात झाली. आता स्थानिक पक्षांनीही या नव्या पिढीच्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी आत्तापासूनच रणनिती आखण्यासाठी सुरुवात केली आहे. (Major decision for Gen Z)
नाराज जेन झींना आकर्षित करण्यासाठी राज्यातील फडणवीस सरकारने एक मास्टप्लान आखला आहे. राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्वाची निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ३१ मार्च २०२७ पर्यंत राज्यभर तब्बल १ हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. (Major decision for Gen Z)
या रोजगार मेळाव्यांची माहिती राज्यातील जास्तीत जास्त गरजू आणि पात्र युवक-युवतींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. रोजगाराच्या संधींबाबत तरुणांना थेट जोडण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावी नियोजन करण्यावरही भर दिला आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रोजगार मेळाव्यांच्या नियोजन, अंमलबजावणी आणि प्रचार-प्रसाराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Major decision for Gen Z)
या बैठकीला राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रविंद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले तसेच सदस्य सचिव आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यासह अन्य शासकीय सदस्य उपस्थित होते. (Major decision for Gen Z)
नेमकं काय होणार? (Major decision for Gen Z)
- आयटीआय व्यतिरिक्त इतर कॉलेजमधील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असणारे तरुण आणि सामाजिक संस्थांशी संपर्क साधून रोजगार मेळाव्याचा विस्तार केला जाणार.
- राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात रोजगार मेळाव्याची माहिती दिली जाईल.
- तरुणांना रोजगाराचे महत्त्व आणि स्वयंरोजगाराचे फायदे पटवून देण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व एनजीओंच्या माध्यमातून समुपदेशन केले जाईल.
- पहिल्या आठवड्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एथिकेट्स (शिष्टाचार), बायोडाटा तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर भर दिला जाईल.
- दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांत थेट प्रात्यक्षिक दिले जाईल.
- केवळ रोजगार मेळावे आयोजित न करता उमेदवारांना पूर्व-प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे.
- रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना दोन आठवड्यांचे कौशल्य व पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असेल.
- उमेदवारांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाल्यास मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असा सरकारला विश्वास आहे.
- या उपक्रमाच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाचे अधिकारी व प्रदेश समन्वय समिती यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.





