सार्वकनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांना सरकार देणार भांडवल
Updated On:

नवी दिल्ली : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (ओआयसीएल), नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एनआयसीएल) आणि यूनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (यूआयआयसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातल्या तीन विमा कंपन्यांना भांडवल देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने तात्वीक मंजुरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या तीन कंपन्यांच्या गंभीर वित्तीय स्थिती आणि नादारी नियमनाच्या पार्श्वभूमीवर तात्काळ 2,500 कोटी रुपये देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.





