राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना ! सरकारी शाळेचे छत कोसळून ४ मुलांचा मृत्यू ; २५ मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Government school roof collapsed। राजस्थानमधील झालावाडमध्ये शाळकरी मुलांसोबत एक मोठा अपघात झाला आहे. या परिसरात एका शाळेचे छत कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मोठ्या दुर्घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे तर अनेक मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
झालावाड जिल्ह्यातील मनोहर पोलीस स्टेशन परिसरातील पिपलोडी येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेचे छत अचानक कोसळले. त्यावेळी वर्गात उपस्थित असलेले विद्यार्थी त्याखाली गाडले गेले. समोर आलेली माहितीनुसार, वर्गात सुमारे ६० मुले उपस्थित होती, त्यापैकी पंचवीस मुले गाडली गेल्याची भीती आहे.
शाळेचे छत कोसळल्याने झालेल्या अपघातानंतर परिसरातील लोक मदतीसाठी पुढे आले. घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न लोकांनी सुरू केला.
अशोक गेहलोत यांनी चिंता व्यक्त केली Government school roof collapsed।
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, “झालावाडच्या मनोहरठाणा याठिकाणी सरकारी शाळेची इमारत कोसळल्याने अनेक मुले आणि शिक्षक जखमी झाल्याचे वृत्त आहे. कमीत कमी जीवितहानी व्हावी आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.” असे म्हणत या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली.
अपघाताची चौकशी Government school roof collapsed।
या घटनेवर प्रतिक्रिया देताना राजस्थान सरकारचे शिक्षण मंत्री मदन दिवालर म्हणाले, “झालावाडमधील एका शाळेत एक दुःखद घटना घडली आहे. हे दुःखद आहे. मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांवर सरकारी खर्चाने उपचार केले जातील. छत कसे कोसळले याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.”





