‘स्वप्निलच्या आत्महत्येला सरकार जबाबदार’; अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
Updated On:

पुणे – महाराष्ट्र सरकारने MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती दोन वर्ष घेतल्या नाहीत. या कारणामुळे पुण्यातील फुरसुंगी येथील MPSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली.
या आत्महत्येला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. अशा MPSC विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी व या घटनेला जबाबदार असलेल्या महाराष्ट्र सरकार विरोधात
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली.
दरम्यान, यावेळी शर्मीला गोरे या विद्यार्थी ने जिल्हाधिकारी कार्यालयाला वरील जाळीवर उतरण्याचा प्रयत्न केला.




