Government of Andhra Pradesh : आंध्र सरकार सुरु करणार थाल्ली-बिड्डा एक्सप्रेस; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
आंध्र प्रदेश सरकार (Government of Andhra Pradesh) लवकरच ५०० नवीन 'थाल्ली-बिड्डा एक्सप्रेस' वाहने ताफ्यात दाखल करणार आहे.

Government of Andhra Pradesh : आंध्र प्रदेश सरकार (Government of Andhra Pradesh) लवकरच ५०० नवीन ‘थाल्ली-बिड्डा एक्सप्रेस’ वाहने ताफ्यात दाखल करणार आहे. या वाहनांद्वारे गर्भवती महिला, प्रसूतीनंतरच्या माता आणि नवजात बालकांना मोफत वाहतूक सुविधा पुरवली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी दिली. या कल्याणकारी योजनेचा लाभ दरवर्षी सुमारे २.७५ लाख महिलांना मिळेल.
मुख्यमंत्र्यांनी (Government of Andhra Pradesh) या सेवेसाठी विशेषरीत्या तयार केलेल्या एसयूव्ही आणि एमयूव्ही वाहनांची पाहणी केली व त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ही वाहने प्रसूतीनंतर माता, बाळ आणि त्यांच्यासोबतच्या एका नातेवाईकाला सरकारी रुग्णालयातून मोफत घरी पोहोचवतील. तसेच ‘हाय-रिस्क’ (उच्च जोखीम असलेल्या) गरोदर महिलांना व तीव्र ॲनिमिया असलेल्या महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात ने-आण करण्यासाठीही यांचा वापर केला जाईल.
या वाहनांमध्ये (Government of Andhra Pradesh) जीपीएस ट्रॅकिंग, वातानुकूलन यंत्रणा, सीट बेल्ट्स, विशेष फूटरेस्ट, प्रथमोपचार पेटी आणि अग्निशमन यंत्रे यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ब्रँडिंग आणि स्टिकर्सचे काम पूर्ण झाल्यानंतर ही सर्व ५०० वाहने राज्यभरात सेवेत दाखल केली जातील.






